Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोसळणारे धबधबे, धुक्याने वेढलेले डोंगर अन् शांत वातावरण; मान्सूनमध्ये भारतातील ‘या’ हिडन जेम ठिकाणांना नक्की द्या भेट

Hidden Gem Of India For picnic In Monsoon: मान्सूनमध्ये भारतातील अनेक पर्यटनस्थळे हिरवळ, धबधबे आणि ढगांनी वेढलेल्या दऱ्यांमुळे अधिकच सुंदर दिसतात. मात्र गर्दी टाळून शांत आणि निसर्गाच्या जवळचा अनुभव घ्यायचा असेल, तर ऑफबीट हिडन जेम ठिकाणे उत्तम पर्याय ठरतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 08:17 AM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

पावसाळा सुरू होताच भारतातील अनेक पर्यटनस्थळांचे सुंदर रुप खुलून येते. हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, ढगांनी वेढलेल्या दऱ्या आणि आल्हाददायक वातावरणामुळे या ऋतूत फिरण्याची मजाच काही वेगळी असते. मात्र, काही लोकप्रिय ठिकाणी किंवा स्पॉट्सवर प्रचंड गर्दी असल्याने प्रवासाचा आनंद कमी होतो. अशावेळी निसर्गाच्या अधिक जवळ असलेली, कमी गर्दीची आणि तुलनेने कमी परिचित पर्यटनस्थळे उत्तम पर्याय ठरू शकतात. शांतता, नैसर्गिक सौंदर्य आणि वेगळा प्रवास अनुभवायचा असेल, तर मान्सूनमध्ये भारतातील ही ऑफबीट ठिकाणे तुमच्या ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये नक्की असावीत.

Eye Infection: पावसाळ्यात वाढतो डोळ्यांच्या इन्फेक्शनचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश

हिरव्यागार भातशेती, धुक्याने झाकलेले डोंगर आणि प्रसन्न वातावरणासाठी झिरो व्हॅली प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिक खुलून दिसतो. शांत वातावरणामुळे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरते.

अगुंबे, कर्नाटक

‘दक्षिण भारतातील चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाणारे अगुंबे मुसळधार पाऊस, घनदाट जंगल आणि मनमोहक सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील धबधबे आणि निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.

पोनमुडी, केरळ

नागमोडी वळणाचे रस्ते, चहाचे मळे आणि ढगांनी वेढलेल्या टेकड्यांमुळे पोनमुडी हे हिल स्टेशन विशेष लोकप्रिय आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. कुटुंबीय आणि जोडप्यांसाठी हे एक शांत आणि रमणीय पर्यटनस्थळ मानले जाते.

मांडू, मध्य प्रदेश

ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि तलावांनी समृद्ध असलेले मांडू पावसाळ्यात अधिकच आकर्षक दिसते. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

प्रवासादरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा

  • हवामानाचा अंदाज तपासूनच प्रवासाचे नियोजन करा.
  • घसरड्या ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे.
  • रेनकोट, छत्री आणि आवश्यक औषधे सोबत ठेवा.
  • निसर्गरम्य ठिकाणी स्वच्छता राखा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
  • मुसळधार पावसात धबधबे किंवा नदीकाठी जाणे टाळावे.
फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या

Web Title: Monsoon hidden gems india offbeat travel destinations zero valley agumbe ponmudi mandu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • indian tourism
  • Monsoon
  • tourist destinations
  • Tourist Spot

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
1

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.