1 खुर्ची, 2 महिला अधिकारी...! गडकरींसमोरच दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जुंपली; एकीने दुसरीच्या अंगावर ओतलं पाणी; Video Viral
महाराष्ट्रातील नागपूर येथे एका सरकारी कार्यक्रमादरम्यान एक विचित्र घटना घडली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आयोजित रोजगार मेळाव्यात दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. नारिंगी साडी परिधान केलेल्या शोभा मधले यांनी राखाडी साडी परिधान केलेल्या सुचिता जोशी यांना धक्का दिला. या हाणामारीमुळे सोफ्यावर पाणी सांडले. माधले यांनी जोशी यांचा हाताला चिमटा काढला आणि त्यांना कोपर मारण्याचा प्रयत्न ही केला. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे आणि आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा संपूर्ण वाद पोस्टमास्टर जनरल (पीएमजी) या पदावरून आहे. या व्हिडिओमध्ये एका वरिष्ठ महिला पोस्टल अधिकाऱ्याने दुसऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला कोपर मारताना दिसत आहे. पोस्टमास्टर जनरल पदावरून दोघांमधील वाद निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधले यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील घरवाड येथे बदली करण्यात आली.
झगड़े की आदत पड़ जाए तो उम्र और पद का भी लिहाज नहीं रहता!! केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी की मौजूदगी में आयोजित रोज़गार मेले में अद्भुत दृश्य दिखा। मंच पर मौजूद दो महिला अफसरों में तनातनी हुई। शोभा मधाले (ऑरेंज साड़ी) ने सुचिता जोशी(ग्रे साड़ी) के हाथ को धक्का दिया, जिससे… pic.twitter.com/WrNOsQT9qt — Gyanendra Shukla (@gyanu999) October 25, 2025
नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांना नवीन नियुक्ती होईपर्यंत नागपूरचा कार्यभार सोपवण्यात आला. दरम्यान, शोभा मधले यांनी बदली स्थगित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यामुळे मधले आणि जोशी यांच्यात गुप्त वाद निर्माण झाला, जो शुक्रवारी नोकरी मेळाव्यातही रंगला.
दरम्यान, शुक्रवारी पोस्टमास्टर जनरल यांना नोकरी मेळाव्याला आमंत्रित करण्यात आले होते, त्यामुळे प्रभारी सुचिता जोशी स्टेजवर होत्या. शोभा मधले देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. दोघेही एकाच सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले आणि त्यानंतर हाणामारी झाली. मधले यांनी जोशींचा हात ढकलला. तिने त्यांचा डावा हात चिमटा काढला. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमधील ही घटना आणि त्यांचे वर्तन चर्चेचा विषय बनला आहे.






