Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी

कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 06:33 PM
Matheran News : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी
Follow Us
Close
Follow Us:
  • आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश,
  • डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील माथेरान डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या यांना जोडणारा रस्ता माणगाव ग्रामपंचायतमधील रस्ता वन जमिनीची परवानगी मिळाली नसल्याने रखडला होता.वन जमिनीतून रस्ता वन विभाग होऊ देत नसल्याने दोन आदिवासी तरुणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.त्यावेळी 30 एप्रिल रोजी अखेरची मुदत या दोन्ही कार्यकर्त्यांनी वन विभागाला दिली होती.दरम्यान,वन विभागाने 22 एप्रिल रोजी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून वन विभागाने पाच टप्प्यात रस्ता बनविण्यास परवानगी दिली आहे.

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याला वन विभागाने परवानगी द्यावी या मागणीसाठी आदिवासी कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 22 एप्रिल रोजी जैतू पारधी आणि गणेश पारधी हे वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करणार होते.माणगाव ग्रामपंचायत मधील वन जमिनीतून रस्ता बनविण्याचा प्रस्ताव वन विभागाने मंजूर केला नव्हता.

Malnutrition in Raigad 2026: रायगडमध्ये कुपोषणाचा विळखा: ४१ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर?

त्यामुळे हे दोन्ही कार्यकर्ते आत्मदहन करणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि शेवटी वन विभागाने 5मे पर्यंत रस्त्याला परवानगी देण्यात येईल असे वन विभागाने लेखी आश्वासन दिले होते.मात्र आदिवासी कार्यकर्त्यांनी 30 एप्रिल ही डेडलाइन देत वन विभागाने परवानगी दिली नाही तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना न देता आत्मदहन केले जाईल असा इशारा दिला होता.

आदिवासी कार्यकर्त्यांच्या आत्मदहन आंदोलन आणि प्रशासनाला न सांगता आत्मदहन करण्याचा दिलेला इशारा यामुळे वन विभाग जागे झाले.वन विभागाचे रायगड जिल्हा उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्याकडे प्रस्ताव पोहचल्यावर त्यांच्या कडून माथेरान डोंगरातील माणगाव ग्रामपंचायत मधील वन जमिनीचा प्रस्तावाला मंजुरी दिले.हा प्रस्ताव 22 एप्रिल रोजी कर्जत येथून पनवेल आणि पनवेल येथून पुढे अलिबाग असा प्रवास करीत उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात पोहचला होता.हा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यकतेखाली असलेल्या समिती पुढे ठेवण्यात आल्यानंतर मंजूर झाला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम मंजूर..
कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.वन विभागाने या रस्त्यातील काही भागाला अद्याप परवानगी दिलेली नाही. माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील रस्त्यासाठी वनविभागाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती.कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत जाणीपूर्वक वनविभागाकडून 3/2 चा दावा मंजूरी देण्यात आली नव्हती.

आत्मदहन आंदोलन
30 एप्रिल पूर्वी माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील वन जमिनीमध्ये रस्ता बनविण्यास जमीन देण्याचा प्रस्ताव वन विभागाने मंजूर केला नाही तर जैतू पारधी आणि गणेश पारधी हे आदिवासी कार्यकर्ते आत्मदहन करणार होते.

30 एप्रिल रोजी आली मंजुरी
माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील मौजे बेकरे गाव हद्दीतील वन जमिनीचे कंपार्टमेंट नंबर 51 मधील सर्वे नंबर 102,101,97 मधील पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.त्यात 1686 मीटर वन जमीन रस्त्यासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.हा रस्ता तीन मीटर रुंद राहणार असून 0.5058 हेक्टर जमीन वन जमीन रस्ता बनविण्यासाठी दिली आहे.

Kajat News : नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला ; अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

 

 

Web Title: Matheran news tribal activists protest finally successful forest department approves construction of road through mountains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • matheran news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?
1

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?

Govertment Business :  एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर
2

Govertment Business : एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!
3

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सेफसाईड’वर; स्वकीयांकडूनच धोका असल्याने माघार?
4

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ‘सेफसाईड’वर; स्वकीयांकडूनच धोका असल्याने माघार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.