रायगडमध्ये कुपोषणाचा विळखा: ४१ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर?
जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून ६ वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी केली. जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी चिंताजनक आहे. तपासणी करण्यात आलेल्या ९४ हजार ६१३ बालकांपैकी ३७१ बालके कुपोषित आढळून आली आहेत.
कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच सरकारी रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी बाल संगोपन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मात्र असे असूनही जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते. आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीत झालेली घट, कुपोषण निर्मितीसाठी गाव पातळी, तालुका पातळीवरील समित्याच अस्तित्वात नसणे, शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकीट खाण्यास मुलांची उदासिनता हि देखील कुपोषण समस्येमागील काही महत्वाची कारणे असल्याची बाब समोर आली आहे.
Mumbai-Pune Missing Link: आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात
९४,६१३ तपासणी केलेली बालके
४१ तीव्र कुपोषित बालके
३३० सौम्य कुपोषित बालके






