Prakash Ambedkar : Uddhav Thackeray does not know who is afraid; Comment by Prakash Ambedkar
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शिवसेनेसोबत युती करणार असल्याची मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे, तसेच प्रकाश आंबेडकर हे भाजपासोबत युती करणार का असं देखील बोललं जात आहे. मात्र या सर्वांवर वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिका मांडली असून, युतीबाबत वंचित बहुजन आघाडीने मागील आठवड्यात भूमिका मांडत ठाकरे गटाबरोबर (Thackeray group) युतीची घोषणा केली आहे. तरी देखील काही विषयांवर चर्चा बाकी आहे, युती झाल्यास आगामी समीकरणं तसेच जागावाटपाबाबत उद्या महत्त्वाची बैठक वंचित बहुजन आघाडी व ठाकरे गटामध्ये होणार आहे.
[read_also content=”म्हैसाळ पाणी प्रकल्प वेळेत नाही झाला तर, जत तालुक्यातील काही गावं कर्नाटकात… https://www.navarashtra.com/maharashtra/if-the-mhaisal-water-project-is-not-completed-in-time-some-villages-in-jat-taluka-going-to-karnataka-350875.html”]
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात उद्या दुपारी १२ वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. युतीबाबत तसेच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काही प्रश्नांवर म्हणजे जागावाटप, आघाडी, आदी विषयावर प्राथमिक चर्चा होईल, अशी माहिती आहे. या बैठकीला माजी मंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाकरे आणि आंबेडकर यांचं एकमत झाल्यास आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाचा उदय होईल, असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.