• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Meeting On Sugarcane Price Is Failed Aggressive Stance Of Farmers Organization

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ; शेतकरी संघटनेने घेतला आक्रमक पवित्रा

सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी, अशी आमची अपेक्षा होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2025 | 11:14 AM
ऊस दराबाबतची बैठक निष्फळ शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांची भूमिका मान्य नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तास बैठक घेऊनही कोणताही तोडगा निघाला नाही. ‘एफआरपी’ची मोडतोड करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली.

बैठकीतील चर्चेवर आम्ही समाधानी नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले की, दराबाबत जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत आम्ही जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. उद्यापासून एक देखील साखर कारखाना चालू करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले आहेत.

सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत, असेही राजू शेट्टी म्हणाले.

गेल्यावर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीही साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला, तर मुख्यमंत्री ५ नोंव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तयारी करावी, असे आवाहन केले आहे.

२०० रूपये दुसरा हफ्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू करणार नाही

दुसरीकडे, चालू वर्षी गळीत हंगामात पहिली उचल ३७५१ रूपये व गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला २०० रूपये दुसरा हप्ता घेतल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार कर्नाटक सीमाभागातील बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरलापुरात (जि. बेळगांव) दिला. बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील कारखाने ३ हजार रूपये पहिली उचल देण्यावर ठाम राहिले आहेत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकी केली असून साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून धरली आहे.

Web Title: Meeting on sugarcane price is failed aggressive stance of farmers organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • kolhapur news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Kolhapur News : ऊस दर निश्चित होत नाही, तोपर्यंत….; वाहतूक अडवून भर रसत्यात ‘स्वाभिमानी’ संघटनेचं आंदोलन
1

Kolhapur News : ऊस दर निश्चित होत नाही, तोपर्यंत….; वाहतूक अडवून भर रसत्यात ‘स्वाभिमानी’ संघटनेचं आंदोलन

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
2

गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Kolhapur : आंदोलन मागे घेण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विनंती
3

Kolhapur : आंदोलन मागे घेण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची विनंती

भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका! आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी
4

भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका! आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेच्या मिलिंद कुमारचा विराट कोहलीला धोबीपछाड! एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा 

अमेरिकेच्या मिलिंद कुमारचा विराट कोहलीला धोबीपछाड! एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा 

Nov 04, 2025 | 04:35 PM
Pune Murder: पुण्यनगरीत दिवसाढवळ्या बाजीराव रोड रक्तरंजित; तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले

Pune Murder: पुण्यनगरीत दिवसाढवळ्या बाजीराव रोड रक्तरंजित; तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धाबे दणाणले

Nov 04, 2025 | 04:31 PM
प्रामाणिकपणा उरलाच नाही! मुंबई उच्च न्यायालयात नोकरी तरी घेतायेत मोफत धान्य, उगारला कारवाईचा बडगा

प्रामाणिकपणा उरलाच नाही! मुंबई उच्च न्यायालयात नोकरी तरी घेतायेत मोफत धान्य, उगारला कारवाईचा बडगा

Nov 04, 2025 | 04:28 PM
काय सांगता! आता एनवेळी तिकीट करता येणार रद्द…. 21 दिवसात मिळणार परतफेड; विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

काय सांगता! आता एनवेळी तिकीट करता येणार रद्द…. 21 दिवसात मिळणार परतफेड; विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Nov 04, 2025 | 04:25 PM
क्रिमिनॉलॉजिस्ट बना, गुन्हेगारीमागचे विज्ञान समजून घ्या! जाणून घ्या पात्रता, कोर्सेस आणि करिअरच्या संधी

क्रिमिनॉलॉजिस्ट बना, गुन्हेगारीमागचे विज्ञान समजून घ्या! जाणून घ्या पात्रता, कोर्सेस आणि करिअरच्या संधी

Nov 04, 2025 | 04:19 PM
Maharashtra Local Body Election Date : अखेर निवडणुकीचं बिगुल वाजलं, 2 डिसेंबरला मतदान; वाचा A टू Z माहिती

Maharashtra Local Body Election Date : अखेर निवडणुकीचं बिगुल वाजलं, 2 डिसेंबरला मतदान; वाचा A टू Z माहिती

Nov 04, 2025 | 04:16 PM
Supreme Court News: ‘तुम्ही आम्हाला टाळत आहात का…?’ CJIभूषण गवईंनी थेट केंद्र सरकारला फटकारले

Supreme Court News: ‘तुम्ही आम्हाला टाळत आहात का…?’ CJIभूषण गवईंनी थेट केंद्र सरकारला फटकारले

Nov 04, 2025 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Nov 04, 2025 | 03:13 PM
Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Sindhudurg : घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वाळूचा अडथळा, कुडाळ तहसीलदारांना निवेदन सादर

Nov 04, 2025 | 03:10 PM
Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा

Sangli News : सामाजिक कर्यकर्त्यांच्या दबावानंतर अतिक्रमणावर चालला हातोडा

Nov 03, 2025 | 08:01 PM
Ambadas Danve : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, Uddhav Thackeray संवाद दौऱ्यातून विचारणार जाब

Ambadas Danve : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, Uddhav Thackeray संवाद दौऱ्यातून विचारणार जाब

Nov 03, 2025 | 07:17 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण

Sindhudurg : सिंधुदुर्गातील पहिला आवळेगावचा जत्रोत्सव संपन्न, दशावताराचे विशेष आकर्षण

Nov 03, 2025 | 03:47 PM
Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!

Palghar : प्रधानमंत्री फसल योजनेतून फक्त दोन रुपयांची भरपाई, शेतकरी संतप्त!

Nov 03, 2025 | 03:45 PM
Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त

Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त

Nov 03, 2025 | 03:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.