Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : न्यायासाठी शांतीदूत सोसायटीचे सभासद पुन्हा बसणार उपोषणाला; माजी आमदार नरेंद्र पवारही होणार सहभागी

शांतिदूत सोसायटी मार्फत पोलीस प्रशासनाकडे सादर केलेल्या तक्रारीची मुदत उलटून गेली आहे. तरीही स्थानिक पोलीस प्रशासन संबंधित विकासकांवर कोणतीही कार्यवाही करत पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2025 | 04:20 PM
न्यायासाठी शांतीदूत सोसायटीचे सभासद पुन्हा बसणार उपोषणाला; माजी आमदार नरेंद्र पवारही होणार सहभागी

न्यायासाठी शांतीदूत सोसायटीचे सभासद पुन्हा बसणार उपोषणाला; माजी आमदार नरेंद्र पवारही होणार सहभागी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही यावर चर्चा होऊन सभासदांना न्याय देण्याचे आश्वस्त केले आहे. मात्र शांतिदूत सोसायटी मार्फत पोलीस प्रशासनाकडे सादर केलेल्या तक्रारीची मुदत उलटून गेली आहे. तरीही स्थानिक पोलीस प्रशासन संबंधित विकासकांवर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे सांगत इथल्या सभासदांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या रविवार ३ ऑगस्टपासून हे सर्व रहिवासी आपापल्या कुटुंबीयांसोबत आमरण उपोषण सुरू करत असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील त्यामध्ये सहभागी होणार आहेत.

वडगावमध्ये अमली पदार्थांची खुलेआम विक्री, तरुणाई  विळख्यात; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

कल्याण पश्चिमेच्या चिकनघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद गेल्या 14 वर्षांपासून आपली हक्काची घरे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्विकासाचे काम घेतलेल्या संबंधित विकासकाकडून झालेल्या अन्यायकारी विलंबामुळे इथल्या शेकडो कुटुंबांवर अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. यासाठी ही सर्व कुटुंब गेल्या 14 वर्षांपासून कायदेशीर लढा देत असून अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. या शेकडो रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

तर नुकत्याच झालेल्या १६ जुलै रोजी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित विकासकांवर 10 दिवसांत कारवाईचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र दहा दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सभासदांकडून सांगण्यात आले. तर 25 जुलै रोजी पुन्हा एकदा शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद आणि विकासक प्रतिनिधी श्री चेतन सराफ व श्री गणेश शितोळे आणि महात्मा फुले पोलिस प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पोलिसांनी कारवाई न केल्याबद्दल एक शब्दही न काढता उलटपक्षी 1 महिन्याची मुदत वाढ मागितल्याची धक्कादायक माहितीही सभासदांनी दिली. तसेच पोलिसांकडून सभासदांना कशाला आंदोलन करता? कशाला विरोध करता, विकासकाला मदत करा असा दबावही पोलिसांकडून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आणि प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक निर्णय अद्याप पर्यंत घेतला जातं नही. या शेकडो रहिवाशी यांनी दाद तरी नक्की कोणाकडे मागायची हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या रविवारी ३ ऑगस्टपासून शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सर्व 184 सभासद आपल्या कुटुंबीय आणि विक्री गटाचे रहिवासी यांच्यासह आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्यामध्ये कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व रहिवाशांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत लढा देऊ असा ठाम निर्धार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.

Congress Politics: जालन्यात काँग्रेसचा गड ढासळला! वरपुडकर यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला

Web Title: Members of the peace messenger society will sit for a hunger strike again for justice former mla narendra pawar will also participate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • maharashtra

संबंधित बातम्या

कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक संपन्न
1

कल्याण-डोंबिवली परिसरातील 27 गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक संपन्न

Nitesh Rane : “अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा…”, नितेश राणे यांचे आदेश
2

Nitesh Rane : “अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा…”, नितेश राणे यांचे आदेश

“रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक…”, FDA च्या कारवाईनंतर श्रीकृष्णा रुग्णालयाचे स्पष्टीकरण
3

“रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक…”, FDA च्या कारवाईनंतर श्रीकृष्णा रुग्णालयाचे स्पष्टीकरण

Kalyan Crime: आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना
4

Kalyan Crime: आधी इंस्टावर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.