Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडाच्या विविध मंडळांच्या आगामी सोडतीतील लाभार्थ्यांना मिळाला ‘हा’ मोठा दिलासा

विखुरलेल्या सदनिका/भूखंडावरील मासिक सेवाशुल्क लाभार्थ्यांना ताबा दिल्यापासूनच आकारावा असा महत्वपूर्ण निणर्य म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 06, 2025 | 08:59 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील विखुरलेल्या सदनिका, भूखंडाचे वितरण करतेवेळी ज्या दिवशी सदनिकेचा/भूखंडाचा ताबा घेतला आहे त्या दिवसापासून लाभार्थ्यांना मासिक सेवाशुल्क व मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी, असा धोरणात्मक निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला असून या निर्णयाचा लाभ आगामी सोडतीतील लाभार्थ्यांना मिळणार आहे.

मुंबई मंडळाच्या विविध वसाहतींमधील विखुरलेल्या सदनिकांचे सेवाशुल्क, मालमत्ता कर इत्यादी बाबींचा समावेश सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये करण्याबाबत निर्णय घेण्याकरिता आयोजित बैठकीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांतील सदनिकांचे/ भूखंडाचे वाटप सोडत प्रक्रियेद्वारे करण्यात येते. विक्री किंमतीमध्ये सदनिकांचे/ भूखंडाचे सेवा शुल्क, मालमत्ता कर इत्यादी करांचा समावेश करण्यात येत नाही. सोडती पश्चात काही कारणांमुळे सदनिकांचा/ भूखंडाचा ताबा विलंबाने होतो.

HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव, परदेशातून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग होणार

सदनिकेचा /भूखंडाचा ताबा देण्यात येईपर्यंत सदरची मालमत्ता ही मंडळाची असते. सदनिकेचा/भूखंडाचा ताबा दिल्यानंतर संबंधित संस्थेद्वारे सदनिकांचे/भूखंडाचे प्रलंबित शुल्काची मागणी मंडळांमार्फत करण्यात येते.

मंडळाच्या विक्री सोडतीतील विखुरलेल्या सदनिकांच्या लाभार्थ्यांवर प्रकल्प उभारल्यापासून मासिक सेवाशुल्क, मालमत्ता कर आकारणी करणे योग्य नसल्याचे सांगत जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, विखुरलेली सदनिका,भूखंड हे पूर्णतः मंडळांच्या ताब्यात असल्याने त्याचा भुर्दंड म्हाडा लाभार्थ्यांवर पडू नये. तरी लाभार्थ्यांनी सदनिकेचा/भूखंडाचा ताबा ज्या दिवशी घेतला आहे त्या दिवसापासून लाभार्थ्यांना सेवाशुल्क, मालमत्ता कर इत्यादी लागू करणे उचित राहील.

संजीव जयस्वाल पुढे हे देखील म्हणाले की, यापुढे कार्यकारी अभियंता यांच्याद्वारे सदनिकेची विक्री किंमत निश्चित करताना सदनिकेचे /भूखंडाचे प्रलंबित सर्व शुल्कांचा समावेश विक्री किंमतीमध्ये अंतर्भूत करण्यात यावा. अशा लाभार्थींना सदनिकेचा/ भूखंडाचा ताबा देण्यात आलेला आहे व गृहनिर्माण संस्थेद्वारे लाभार्थ्यांकडे सेवाशुल्क इत्यादी करांची मागणी करण्यात येत आहे. तसेच या सर्व शुल्कांचा भरणा संबंधित कार्यकारी अभियंता यांनी परस्पर संस्थेस अदा करावे व सदरचा खर्च आगामी सोडतीमध्ये प्रस्तावित असलेल्या योजनांवर अधिभार करण्यात यावा. परंतु ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी शुल्कांचा भरणा संस्थेस केला आहे, अशा लाभार्थ्यांना सदरचा ठराव लागू होणार नाही.

Nashik Accident : भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडलं; शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काळाचा घाला

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील महिन्यांची थकबाकी असल्यास ती सदनिका/ भूखंडाच्या विक्री किंमतीमधील (अनफोरसीन लायबिलिटी , अ‍ॅटीसीपेटेड लायबिलिटी किंवा नफा किंवा स्थान महत्व अधिक्य इत्यादि) कुशन मधून मंडळाने अदा करावे. मात्र, त्याचा भार लाभार्थ्यांवर टाकू नये, असा धोरणात्मक निर्णय जयस्वाल यांनी जाहीर केला. यामुळे आता नक्कीच म्हाडाच्या विविध मंडळांच्या आगामी सोडतीतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Mhada decision the monthly service charge on scattered flatsplots should be charged to the beneficiaries from the date of possession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • MHADA Homes

संबंधित बातम्या

Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान
1

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही
2

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
3

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार
4

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.