Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव (वा.) तालुक्यातील म्हसावद येथे म्हसावद-बोरनार रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या दहा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडलेले असल्यामुळे अवजड वाहने गावातूनच मार्गक्रमण करत आहेत. परिणामी, म्हसावदच्या मुख्य चौफुलीवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हसावद येथील चौफुली परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. Jalgaon News:
रस्त्यावरील अतिक्रमण आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे अवजड वाहनांसह एसटी बसेसना मार्ग काढणे कठीण होत आहे. याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असून, एरंडोल आगाराच्या बसेस अतिक्रमण आणि काहींकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एसटी बससेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत.
म्हसावद येथील रखडलेले उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणे, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे, चौफुलीवरील अतिक्रमण हटविणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच एरंडोल आगारासह संबंधित परिवहन विभागाने बंद किवा विस्कळीत झालेल्या बसफे यांचा प्रश्न सोडवून ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. म्हसावदसारख्या महत्त्वाच्या गावात मूलभूत वाहतूक सुविधांचा प्रश्न प्रलंबित राहणे ही चितेची बाब आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या ग्रामीण भागात जळगाव-कुरंगी ही एकमेव बस ये-जा करत असल्याची परिस्थिती असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, म्हसावद हे पंचक्रोशीतील मोठे आणि महत्वाचे गाव आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसीअंतर्गत म्हसावद पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बैंक ऑफ
इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बैंक तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अशी महत्वाची प्रशासकीय व आर्थिक कार्यालये आहेत. याठिकाणी दररोज परिसरातील अनेक गावामधून नागरिकांची ये-जा सुरू असते. असे असतानाही वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि एसटी बससेवेच्या समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Ans: रखडलेले उड्डाणपूल काम, रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि वाढते अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
Ans: उड्डाणपुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे.
Ans: म्हसावद-बोरनार रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे.






