Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: “मंत्री साहेब, किती दिवस खड्ड्यात?” खड्डे, धूळ अन् रखडलेले काम, म्हसवडमधील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक हैराण

Satara News Marathi : म्हसवड येथील चांदणी चौक ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या अर्धवट रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डे, धूळ, पाईपलाईन अडथळे आणि पावसाळ्यापूर्वी वाढणाऱ्या समस्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 11:27 AM
“मंत्री साहेब, किती दिवस खड्ड्यात?” खड्डे, धूळ अन् रखडलेले काम, म्हसवडमधील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक हैराण

“मंत्री साहेब, किती दिवस खड्ड्यात?” खड्डे, धूळ अन् रखडलेले काम, म्हसवडमधील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:
  • म्हसवडमधील चांदणी चौक- पोलीस स्टेशन रस्ता दीड वर्षांपासून रखडला
  • पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार?
  • म्हसवडमधील अर्धवट रस्त्यामुळे नागरिक हैराण
म्हसवड : “मंत्री साहेब म्हसवड चांदणी चौक ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या अर्ध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून आम्ही किती दिवस खड्डयात आणि धुळीत राहायचं” असा प्रश्न या रस्त्या वरून येणा जाणारी व येथील रहिवाशी जनता दबक्या आवाजात विचारीत आहे.
दीड वर्षांपूर्वी म्हसवड येथील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामधील पोलीस स्टेशन ते चांदणी चौक रस्त्याचे काम गेले एक वर्ष रखडलेले आहे .

नगरपालिका व विधानसभा मतदानाच्या स्वार्थासाठी मंजूर रस्त्याच्या कामाची अक्षरशः वाट लागली आहे. रस्त्याच्या मधोमध नगरपालिकेची पाणीपुरवठा पाईपलाईन, टेलिफोन केबलच्या पाईप यामुळे रस्त्याचा बट्टयाबोळ झाला आहे. रस्ता पीडब्ल्यूडी विभागाकडे रस्त्याच्या कामाची अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर मंजुरी मात्र नगरपालिका प्रशासनाचा अडदांड कारभारी यामुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे. पाईपलाईन व गटार व्यवस्थेमध्ये नगरपालिकेची जबाबदारी असताना त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. रस्त्यात मधोमध पाईपलाईन टाकल्यामुळे सदर पाईप लिकेज झालास रस्ता खोदल्याशिवाय पर्याय नसतो. मग नगरपालिकेला कळत नाही का? पाईपलाईन रस्त्याच्या कडेने टाकावी आंधळ दळतय आणि पीठ खात आहे अशी अवस्था झालेली आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था दळणवळणाच्या सुविधेची झालेली आहे. एकतर काम मंजूर होत नाही त्याला निधी मिळत नाही. मात्र इथं सगळं असताना काम गेले दीड वर्षे अर्धवट अवस्थेत राहिलेले आहे. गेल्या आठवड्यात काम सुरू केले पण लगेच बंद पडले. पुढे महिन्याभरात पावसाळा आला आहे. आता काम नाही झालं तर आगामी पावसाळ्यात पाणी व चिखलामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. पीडब्ल्यूडी व ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्यांनी थेट नगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवले आहे. नगरपालिका आम्हाला सहकार्य करत नाही त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. काम करताना पाईप फुटली तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असे सांगितले जाते. पाईप रस्त्यात व वरच मग काम कसे करायचे ?

याबाबत जबाबदारी कोणाची असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. काही ज्येष्ठ व जाणकार मंडळी दबक्या आवाजात बोलत आहेत. आम्ही किती दिवस रस्त्यासाठीच्या खड्ड्याचा व धुळीचा त्रास सहन करायचा. मंत्री साहेब आता तुम्हीच बघा आणि नगरपालिकेचे कान उपटा. अन्यथा हीच जनता आगामी पावसाळ्यात अपूर्ण कामांमध्ये तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मंत्री साहेब तुम्ही रस्ता मंजूर केला निधी आणला मात्र ठेकेदाराला नगरपालिका सहकार्य करत नाही हे ठेकेदाराचे म्हणणे आहे. राजकारण जाऊ द्या खड्डयात पण चांदणी चौक ते पोलीस स्टेशन रस्त्याची दुरावस्था थांबवा हीच येथील जनतेची मागणी आहे. मंजूर असणाऱ्या या रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?

Web Title: Mhaswad chandani chowk police station road work delayed public anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mhaswad
  • Satara

संबंधित बातम्या

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
1

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.