सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! (Photo Credit- X)
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. आता आवश्यक निकष पूर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
मतदान गुरुवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सांगली हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून निवासी उपजिल्हाधिकारी सांगली व सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. नगरपालिका व नगरपंचायत मतदार 398, जिल्हा परिषद मतदार 76 असे एकूण 479 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण अशा सात उपविभाग मुख्यालयांवर मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी






