Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला आहे.

  • By विवेक
Updated On: May 24, 2026 | 09:08 PM
mini kumbhmela in Wai besides Krushna river, mini kumbhmela in Wai, Wai city news, Saatara news,

mini kumbhmela in Wai besides Krushna river, mini kumbhmela in Wai, Wai city news, Saatara news,

Follow Us
Follow Us:

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला आहे. धार्मिक वातावरण, साधू-संतांचा वावर, आकर्षक रोषणाई आणि कृष्णा आरतीमुळे वाई नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत आहे.

या लघु कुंभमेळ्यासाठी उज्जैन हरिद्वार हिमाचल प्रदेश गुजरात येथून नागा साधू विशेष दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीमुळे मेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. विविध धार्मिक विधी, होम-हवन, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि आरती सोहळ्यांमुळे भाविकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठी तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियातील नागरिकांनीही या लघु कुंभमेळ्याचा अनुभव घेत वाईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले. त्यामुळे वाईच्या या उपक्रमाची कीर्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शुक्रवारी शहरात जोरदार पाऊस होऊनही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला दिसला नाही. मुसळधार पावसातही कृष्णाघाट परिसरात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. घाट परिसरातील मंदिरे, साधू-संतांचे दर्शन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी झाली होती.मेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण घाट परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. संध्याकाळी हरिद्वार व गंगा नदीच्या आरतीच्या धर्तीवर कृष्णा नदीची भव्य आरती होत असून ती या मेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. आरतीवेळी निर्माण होणारे भक्तिमय वातावरण भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देत आहे. अनेक भाविक या साधुसंतांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगाच्या रांगा लागत आहेत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सुरू केलेल्या या लघु कुंभमेळ्याला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून दररोज तब्बल २० ते २५ हजार भाविक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. महिला भगिनी, संत मंडळी, विविध सामाजिक संस्था, आयोजक व प्रायोजक यांच्या सक्रिय सहभागामुळे मेळ्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. वाईकर जनतेनेही या उपक्रमाचे कौतुक करत हा मेळा भविष्यात महाराष्ट्रातील एक मोठे धार्मिक आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पुढील तीन वर्षांत हा लघु कुंभमेळा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल बाबा भोसले आमदार मनोजदादा घोरपडे आमदार महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे वाई तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व वाई शहरातील नगरसेवक, सर्व आजी-माजी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढत्या उष्म्यामुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी सुनील साळुंखे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सुधीर वाळुंज, अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० ते २५० पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
चौकट

वाई तालुक्यातील लघुकुंभ मेळ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी हजेरी लावली त्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी सांगितलं, मला हा भक्तिमय व सांप्रदायिक कार्यक्रम पाहण्याचं भाग्य लाभलं मी या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर दोन दिवस मांसाहार केला नाही ड्रिंक केली नाही मलाही हिंदू संस्कृती खूप आवडली सर्व या ठिकाणी भक्ती मय वातावरण मंदिरे घाट व विद्युत रचना हे पीटर यांचे प्रमुख आकर्षण झाले संत महंत यांचं मला दर्शन घेता आलं व आपल्या सर्वांचे मला या ठिकाणी भरपूर प्रेम मिळालं,” असंही त्यांनी या ठिकाणी सांगितले.

विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात राष्ट्रवादीसमोर नवा चेहरा देण्याचे आव्हान; ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Web Title: Mini kumbhmela in wai besides krushna river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Satara
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
1

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
2

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
3

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
4

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.