Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2025 | 04:50 PM
मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूर्वीचे अनुभव पाहता ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरुडसह शहरात कुठेही पाणी साचणार नाही, ते प्रवाहित होईल याची दक्षता घ्या, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच, पावसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी कोथरुड मतदारसंघात एक नोडल अधिकारी नेमावा, अशी सूचना पाटील यांनी यावेळी दिली.

कोथरुड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोमारे, आपत्ती व्यवस्थापनचे उपायुक्त गणेश सोनुने, आशा राऊत, कर विभागाचे अविनाश संकपाळ यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, तीनही प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी यांनी पुणे शहरासह कोथरूड मतदारसंघातील पावसाळी पूर्व कामांची माहिती पाटील यांना दिली. यात प्रामुख्याने पाणी वाहून नेणाऱ्या शहरातील २०१ मुख्य नाले असून, त्यापैकी १५ नाले हे कोथरुड मतदारसंघात असल्याची माहिती दिली. ह्या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नामदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरासह मतदारसंघातील नाले सफाईची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. तसेच, मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावे. त्यासोबतच, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळा पूर्व कामांच्या पाहणीचा २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना कोथरुड मधील सर्व माजी नगरसेवकांना केल्या.

यावेळी क्षेत्रीय कार्यालयांना कोणतेही अधिकार नसल्याने, दरवेळी अधिकाऱ्यांना कामांसाठी मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे अनेक नागरी समस्या दीर्घकाळ रेंगाळतात, असा मुद्दा बैठकीत मांडला गेला. त्यावर नामदार पाटील यांनीही हा प्रश्न सुटला पाहिजे; अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन क्षेत्रीय कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मकता दर्शविली. तसेच, पावसाळ्यात अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्याची समस्या मांडण्यात आली. ही गंभीर बाब असल्याने त्याचेही नियोजन करण्याची सूचना पाटील यांनी यावेळी केली. दरम्यान, या बैठकीत वीजपुरवठा खंडित होणे, झाडांच्या फांद्या वेळेत काढणे यांसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

Web Title: Minister chandrakant patil has given important instructions to the officials in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Cmomaharasahtra
  • pune news
  • Pune Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
1

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
2

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
3

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
4

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.