धनंजय मुंडे यांच्यानंतर आता 'या' मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर वाढतोय दबाव
बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे नेते देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे अगदी मुंडेंची दिल्लीवारी झाली असून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. मागील महिन्याभरापासून धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात येत असून यावर आता धनंजय मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान बाबा गडावर दर्शन घेत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्रींची भेट घेतली. यानंतर नामदेव महाराज शास्त्रींनी माध्यमांशी संवाद साधून धनंजय मुंडे हे गुन्हेगार नसून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे. यामुळे भगवानबाबागड धनंजय मुंडेच्या बाजूने उभे आहे असे स्पष्ट सांगितले आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मला फक्त कळालं की, “डॉ.नामदेव महाराज शास्त्रींची मुलाखत झाली आहे. हा भगवानाबाबा गड माझ्यापाठीमागे उभा आहे हे मला सांगितलं. यासारखी ताकद, शक्ती आणि विश्वास पाठीमागे उभा आहे ही फार मोठी जबाबदारी आहे. गरिबाच्या एक एक रुपयातून उभा झालेला हा गड आहे. त्यामुळे भगवान बाबा यांना ऐश्वर्यसंपन्न म्हटलं जातं. अशा संघर्षाच्या आणि कठीण काळात हा गड माझ्या पाठीशी उभा आहे. ही माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. या शक्तीचं वर्णन मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही,” असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “माझ्यावर हे संकट आज आलेलं नाही. मागच्या 53 दिवसांपासून आपण हे पाहत आहेत. आज 53 वा दिवस आहे. सोशल मीडिया आणि इतर मीडियावर मला टार्गेट करुन एक मीडिया ट्रायल घेतले जात आहे. या तीन महिन्यांमध्ये मी एक शब्दही कुठेही बोललो नाही. त्यामुळे संकटात मी कधीही गडावर येऊ शकलो असतो. पण भावना ही होती की आपण मंत्री झालो आहोत पण अजून गडावर गेलो नाही. या भावनेतून भगवानबाबागडावर आलो आहे,” अशा भावना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डॉ.नामदेव महाराज शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर मंत्री मुंडे म्हणाले की, “मी कधीही बाबांसोबत राजकीय चर्चा करत नाही. किंवा ते देखील कधी राजकीय विषयांवर चर्च करत नाही. आमच्यामध्ये जी चर्चा झाली ती आध्यात्मिक झाली. ज्ञानेश्वरीतील अनेक अनुभव ते सांगतात. त्यातून आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीवन चांगलं बनवण्यासाठी प्रेरणा मिळते,” असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.