Photo Credit- Team Navrashtra महायुतीचं 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाला सुरूंग, पण नेमकं अडलंय कुठं?
विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतरही राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात “ऑपरेशन टायगर”च्या चर्चांना सुरू आहेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे काही खासदार थेट भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. भाजपकडून हे ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील खासदार फोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच सहापैकी पाच खासदारांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची पूर्ण तयारी झाली आहे. पण केवळ एका खासदारामुळे भाजपप्रवेश अडल्याचे सांगितले जात आहे. तर एका खासदार अद्याप ठामपणे निर्णय घेऊ शकत नाहीये. पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ नये म्हणून नऊ पैकी सहा खासदार फुटणे आवश्यक आहे. अन्यथा या फुटीर गटांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचे असेल तर सह खासदारांनी फुटणे आवश्यक आहे.
या नेत्यांशी चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात आहे. हा नेता लवकरच शिवसेनेत सामील होऊ शकतो. त्याचवेळी, रवींद्र धंगेकर यांनी वैयक्तिक कामाच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (MVA) मोठ्या पराभवानंतर, अनेक नेते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली आहे.
सुरुवातीला ठाकरेंचे खासदार शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा होती, मात्र आता हे सर्व खासदार शिंदे गटाऐवजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरेसेनेचे खासदार भाजपात सामील होण्यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठी नाराजी पसरली आहे, कारण यामुळे एकनाथ शिंदे गटाचे केंद्रातले महत्त्व कमी होण्याची भीती आहे. यामुळे शिंदे गटाच्या अंतर्गत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
ICC Women’s U-19 T20 World Cup सेमीफायनलमध्ये टीम इंडिया लढणार इंग्लंडशी
तसेच, कोथरूडचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे शिवसेना शिंदे गटात संभाव्य प्रवेशाबद्दल चर्चाही सुरू आहे. पुण्यातील तीन माजी आमदार, ज्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे, हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. पुण्यात होणाऱ्या या “ऑपरेशन टायगर”ला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) ला धक्का देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (पुणे – कसबा जागा) आणि शिवसेनेचे (यूबीटी) माजी आमदार महादेव बाबर (पुणे – हडपसर जागा), माजी आमदार सुभाष बने (रत्नागिरी – संगमेश्वर जागा), माजी आमदार गणपत कदम ( माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (रत्नागिरी- राजापूर जागा), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (पुणे- कोथरूड जागा) आणि विद्यमान आमदार यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.