Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore: “…यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत”; मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना

ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे.ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2025 | 07:28 PM
Jaykumar Gore: "...यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत"; ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

Jaykumar Gore: "...यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत"; ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने करावे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने होण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने अमंलबजावणी करावी. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेने सुरू करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही, बांधायला जागा नाही असे लाभार्थी प्रथम प्राधान्याने घ्यावे. तसेच जागा असलेल्या मात्र घर नसलेल्या लाभार्थीची स्वतंत्र यादी करावी, असे सूचित करुन गोरे यांनी सांगितले की, घरकुल मंजूरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गावागावांत ग्राम सभांमध्ये याबाबत माहिती द्यावी.

हेही वाचा: PM Awas Yojana : महाराष्ट्राला २० लाख घरं मिळणार; पंतप्रधान आवास योजनेतील या जाचक अटीही हटवल्या

घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी

मंत्री गोरे म्हणाले, घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी. जेणेकरून गावातील सर्वांना घरकूल लाभार्थ्यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहचवावेत. सर्वेक्षण करताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम करावे. कोकण पट्ट्यात गावातील गावठाण जमिनी घरकूल योजनेसाठी वापराव्यात. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गतही घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.

ग्रामविकास योजनांच्या अनुषंगाने नाशिक जिल्हा विभागाची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन सभागृहात पार पडली.
यावेळी पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र ग्रामीण… pic.twitter.com/GfTIR1K1RV
— Jaykumar Gore (@Jaykumar_Gore) January 28, 2025

योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी

ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे. त्यात ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी सर्व गटांची सक्रियता वाढविण्यावर यंत्रणानी अधिक लक्ष द्यावे. हे सर्व गट सक्रिय होण्यासाठी समन्वयपूर्वक कार्यपद्धती स्वीकारुन कामांची गती वाढवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रभाग संघाना भेटी द्याव्यात. विभागांतर्गत विविध योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.गोरे यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा: पीएम आवास योजना 2.0 चे अर्ज सुरु, नवीन घराच्या आर्थिक मदतीसाठी तयार ठेवा ‘ही’ डॉक्यूमेंट्स

यंत्रणांनी स्थळ पाहणी वेळेत करावी

ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सूचित करुन सांगितले की, कामांची वेळेत आणि दर्जेदार पूर्तता होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा. स्थळ पाहणी वेळेत करावी. हप्ता वितरित केल्यावर घरकुलाच्या सुरु केलेल्या कामाची नोंदणी व्यवस्थित ठेवावी. कामाच्या टप्पानिहाय विहित केल्यानुसार लाभार्थ्यांना हप्ते द्यावे. विभागांर्तगत बचतगटांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिक संख्यने ते कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणाप्रमुखांनी त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. ग्रामविकास विभागाच्या लखपती दिदी योजनेसह इतर सर्व योजनांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे निर्देश श्री.कदम यांनी दिले. ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान यासह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

Web Title: Minister for rural development and panchayat raj jayakumar gore said each person get home pm awas yojana marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 07:28 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Jaykumar Gore
  • PM Awas Yojana news

संबंधित बातम्या

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…
1

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
2

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.