Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जे पक्षाला सोडतात, ते निवडून येत नसतात!’ महायुतीबाबत निर्णय न झाल्याने मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महायुतीबाबत निर्णय न झाल्याने मंत्री नरहरी झिरवाळांनी कार्यकर्त्यांना निष्ठा जपण्याचे आवाहन केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 11, 2025 | 07:03 PM
अहिल्यानगरमध्ये मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

अहिल्यानगरमध्ये मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीबाबत अद्याप निर्णय नाही
  • अहिल्यानगरमध्ये मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन
  • कार्यकर्त्यांना निष्ठा जपण्याचे आवाहन
अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकानिहाय मुलाखतीदरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना निष्ठा राखण्याचे आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, या निवडणुका महायुतीतून लढवायच्या की स्वबळावर, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पक्ष सोडणारे निवडून येत नाहीत. त्यामुळे संयमाने आणि निष्ठेने काम करा,” असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अरुण तनपुरे, दत्ता पानसरे, संपत बारस्कर, अशा निंबाळकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. झिरवाळ म्हणाले की, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक वाटा मिळावा ही अपेक्षा असून, ज्या ठिकाणी पक्षाची ताकद अधिक आहे तेथे जागा मिळायलाच हव्यात. “मुस्लिम मतदार भाजपला मतदान करत नाहीत म्हणून त्या जागा आपोआप राष्ट्रवादीला द्याव्यात, हे योग्य नाही,” असेही त्यांनी निदर्शनास आणले.

शिक्षकांची रवानगी निवडणूक कामासाठी, पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात शिक्षकांची कुचंबणा!

उमेदवारीत पक्षकार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे – आमदार संग्राम जगताप

राज्यातील अस्थिरतेचा कालखंड संपला असून महायुतीमुळे स्थैर्य निर्माण झाले आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणे आवश्यक असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. नगर शहर आणि दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याने उमेदवारी देताना स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांचाच विचार व्हावा, असे त्यांचे मत होते.

Chiplun News: कुंभार्ली घाट बनलाय मृत्यूचा सापळा; अपघाताची भीती कायम

स्थानिक आमदारांना युतीचे अधिकार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक आमदारांच्या हाती देण्यात आल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. शिर्डी आणि संगमनेर येथे महायुतीनेच निवडणुका लढवल्या जातील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर आणि नेवासे येथेही परिस्थिती साधारण अशीच असून, कोपरगावात मात्र युतीची शक्यता कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेची निवडणूक महायुतीत होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पराभव मोठा धक्का ठरेल, असेही विखे पाटील म्हणाले.

Web Title: Minister narahari jirwals appeal to political workers in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics
  • Narhari Zirval

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
3

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
4

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.