Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Party: “खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न…”; मंत्री झिरवाळांचे प्रशासनाला स्पष्ट निर्दश

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे, असे स्पष्ट निर्देश झिरवाळ यांनी दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2025 | 03:47 PM
New Year Party: “खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न…”; मंत्री झिरवाळांचे प्रशासनाला स्पष्ट निर्दश
Follow Us
Close
Follow Us:

अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक
आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व
अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली मोठी मोहीम

मुंबई: नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर, तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ उपक्रम

उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ रोजी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जेजुरी येथील भंडाऱ्याचा 2,200 किलोचा स्टॉक जप्त

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवाच्या वेळी भंडाऱ्याचा भडाका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. भंडारा पेट घेत नसतो सदर आगीसाठी तेल अथवा इतर काही कारण असू शकते. या प्रकरणी औषध निरीक्षक व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. यावेळी पिशव्यांमध्ये साठवलेला २,२०० किलो भंडाऱ्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये हळद आढळून आली आहे. सदर साठा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

Web Title: Minister narhari zirwal instructs for thorough inspections of hotels about new year party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Narhari Zirval
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी
1

Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी

Year Ender 2025: Ghibli पासून Nano Banana पर्यंत, या व्हायरल ट्रेंड्सनी सोशल मीडियावर घातला होता धुमाकूळ
2

Year Ender 2025: Ghibli पासून Nano Banana पर्यंत, या व्हायरल ट्रेंड्सनी सोशल मीडियावर घातला होता धुमाकूळ

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा
3

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स
4

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.