Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant : तुमची 40 वर्षांची सत्ता मोडून काढणार; उदय सामंतांची भाजपच्या नेत्यावर टीका

तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 05:28 PM
तुमची 40 वर्षांची सत्ता मोडून काढणार; उदय सामंतांची भाजपच्या नेत्यावर टीका

तुमची 40 वर्षांची सत्ता मोडून काढणार; उदय सामंतांची भाजपच्या नेत्यावर टीका

Follow Us
Follow Us:
  • तुमची 40 वर्षांची सत्ता मोडून काढणार
  • उदय सामंतांची भाजपच्या नेत्यावर टीका
  • सामंतांचं जनतेला मोठं आश्वासन
सासवड : तुमच्याकडे ४० वर्षे सत्ता असताना तुम्हाला सासवडच्या नागरिकांसाठी पाणी देता आले नाही, नळ दिले नाहीत, विकासाची कोणती कामे नाहीत, एवढच काय पण एखादे क्रीडांगणही देता आले नाही, हा सासवडकर जनतेचा अपमान आहे. यापुढे येथील विकासाचे एकही काम थांबणार नाही. एकाच वर्षात सर्व कामांना मंजूरी आणणार, असे सांगतानाच तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.

सासवडमध्ये शिवसेना ( एकनाथ शिंदे ) उमेदवारांच्या प्रचारार्थ उदय सामंत आले होते. यावेळी त्यांनी संजय जगताप यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी आमदार विजय शिवतारे, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना महिला आघाडीच्या ममता शिवतारे, माजी सभापती अतुल म्हस्के, हरिभाऊ लोळे, माणिक निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार, कार्यकर्ते होते.

कामांना लागेल तेवढा निधी देतो

आम्ही कोकणातील आहोत. दादागिरी आम्हाला चांगली माहिती आहे. तुमच्या दादागिरीना भीक घालणार नाही. विजय शिवतारे विधीमंडळात दादागिरी करतात निधी आणण्यासाठी. दादागिरी करून राजकारण होत नाही त्यासाठी निधी आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. चांगल्या कामांना लागेल तेवढा निधी देतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.

उद्याची ही नवीन महापालिका होणार

आमदार विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांना अडीच वर्षे तुमची सत्ता होती. मग, पाणी योजना का करता आली नाही. जेजुरीचा विकास आराखडा करण्याचे तुम्हाला का सुचले नाही ? असे प्रश्न उपस्थित केले. आमची सत्ता आल्यावर मी विकास आराखडा बनवला. उद्याची ही नवीन महापालिका होणार असून, पुढील निवडणूक नवीन पुणे महापालिका अशी होणार आहे. हडपसर, जेजुरी, हडपसर, यांची एकत्रित महानगरपालिका होणार आहे, असेही शिवतारेंनी सांगितले.

महिन्याला स्वीकृत नगरसेवक करतील

यापूर्वी सहा महिन्याला स्वीकृत नगरसेवक होता. आता प्रत्येक महिन्याला स्वीकृत नगरसेवक करतील. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. हे मूळ भाजप नाही तर काँग्रेसयुक्त भाजप आहे. माझ्याकडून पराभव झाल्यावर तिकडे गेलेत, पण त्यांच्यात मूळ भाजपचे कोणी नाही. जिकडे पाहावे तिकडे त्यांची नावे हे आता थांबवायचे आहे, असा घणाघात शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे.

Web Title: Minister uday samant has strongly criticized the bjp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • BJP
  • Uday Samant
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.