Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar: कुणाल कामराच्या विनोदावर शिवसेना आक्रमक ; स्टँडअप कॉमेडियन विरोधात तक्रार दाखल

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. कॉमेडीयनच्या विरोधात कार्यकर्त्यांनी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2025 | 03:53 PM
कुणाल कामराच्या टीकेवर शिवसेना आक्रमक ; स्टँडअप कॉमेडियन विरोधात तक्रार दाखल

कुणाल कामराच्या टीकेवर शिवसेना आक्रमक ; स्टँडअप कॉमेडियन विरोधात तक्रार दाखल

Follow Us
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने  उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर सार्वजनिक मंचावर विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून विनोद केले होते. दरम्यान या सगळ्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे.  कुणाल कामराने  अशोभनीय टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी राज्यभरातून कामराच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली असून, मीरा-भाईंदर शहरातही शिवसेनेच्या वतीने पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेची कारवाईची मागणी

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 146 विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कामरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली व यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले.या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर, 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, 145 विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंग, 146 विधानसभा महिला प्रमुख पूजा आमगावकर, तसेच शिवसेनेच्या लीगल सेलचे अध्यक्ष राजदेव पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेची भूमिका – ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे’

शिवसेनेने ठाम भूमिका घेत “व्यंग, विनोद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादेत असावे, मात्र कुणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी, व्यक्तिगत स्वरूपाची टीका करणारी भाषा योग्य नाही”, असे मत मांडले आहे.

“महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी आहे. समाजात गैरसमज पसरवून लोकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे,” असे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कामराच्या मागे ‘संजय राऊत’ असल्याचा आरोप

शिवसेनेने असा दावा केला आहे की या प्रकारामागे खासदार संजय राऊत यांची भूमिका असू शकते. त्यांचा हा ‘सुपारी प्रकरण’ असल्याचा आरोप करत “पोलीस यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,” अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ST News : ३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची होणार बदली, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

शिवसेनेच्या मागण्या:

1. कुणाल कामरावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.

2. विडंबनात्मक गाण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नांना आळा घालावा.

3. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

कुणाल कामराच्या स्टुडिओ तोडफोडीनंतर हर्षवर्धन सपकाळ संतापले; नुकसान भरुन देण्याची केली मागणी

राज्यातील इतर भागांतही विरोध सुरू

कुणाल कामराच्या या टीकेनंतर महाराष्ट्रातील विविध भागांत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला जात आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे आता पोलीस यंत्रणा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mira bhayandar shiv sena aggressive on kunal kamras criticism complaint filed against stand up comedian

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mira Bhyander
  • shivsena

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.