Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीकडून‌ दुजाभावाची वागणूक : आमदार बाबर

महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे आणि आमची कामे पद्धतशीरपणे डावलायची, हे यापुढे सहन करणे अशक्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना आमदारांनी आपली तक्रार मांडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2022 | 03:04 PM
महाविकास आघाडीकडून‌ दुजाभावाची वागणूक : आमदार बाबर
Follow Us
Follow Us:

विटा : महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे आणि आमची कामे पद्धतशीरपणे डावलायची, हे यापुढे सहन करणे अशक्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना आमदारांनी आपली तक्रार मांडली. राष्ट्रवादी-काँग्रेसबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.

मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक झाली. त्यावेळी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामीण विकास, गृह, अर्थ आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमकतेने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही शासनाच्या विविध खात्यांनी बाबतचा निधी वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने दुजाभाव करीत आहेत, हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.

यावेळी खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीच्या एकूणच पक्ष आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्याबाबत तक्रारी मांडल्या. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कारभारामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, प्रदीप जैस्वाल, अनिल राठोड यांनीही आपल्यावर व कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखवली.

गेल्या महिन्यात आमदार अनिल बाबर आणि माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते ॲड. वैभव पाटील यांच्यामध्ये टेंभू योजनेच्या कामांवरून श्रेयाचा वाद पेटला होता. तो अद्याप संपलेला नाही.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा खोरेतून अतिरिक्त वाटपाचे पाणी टेंभू उपसा जलसिंचन योजनेला मिळवून दिल्याबद्दल बाबर आणि पाटील या दोन्ही गटांनी त्यांचे अभिनंदन करीत विट्यात जाहीर मिरवणूक काढण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या मतदारसंघात ढवळाढवळ करीत आहेत, अशी तक्रार आमदार बाबर यांनी केली आहे.

अर्थ खात्याकडूनही शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत आहे, तसेच मंत्री अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना केराची टोपली दाखवली जाते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तत्परतेने होत आहेत, असा आरोप आमदारांनी केला

Web Title: Mla anil babar criticized on mva government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2022 | 03:04 PM

Topics:  

  • Atpadi
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
1

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
3

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
4

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.