Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Marathwada Mukti Sangram: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांची नावे असलेल्या स्मृतीस्तंभाची बुलडोझरच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक स्मृती जपणारा स्तंभ जमीनदोस्त झाल्याने संताप व्यक्त केला जात असून या कारवाईला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 05:44 PM
हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

Follow Us
Follow Us:
  • 17 हुतात्म्यांची नावे असलेला स्मृतीस्तंभ जमीनदोस्त
  • जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची साक्ष देणारा स्तंभ उद्ध्वस्त
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : मराठवाड्याला निजामाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींशी निगडित असलेल्या स्मृतीस्तंभाची धाराशिव नगरपालिकेने बुलडोझरच्या सहाय्याने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेल्या या स्मृतीस्तंभाची अक्षरशः राखरांगोळी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व हुतात्म्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. (Marathwada Mukti Sangram)

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

शहरातील जुन्या पोलीस ठाण्यासमोर असलेला हा स्मृतीस्तंभ काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज उद्यानात स्थलांतरित करण्यात आला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १७ हुतात्म्यांची नावे या स्तंभावर कोरण्यात आली होती. स्तंभाच्या मागील बाजूस भारतीय संविधानाची उद्देशिका कोरण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय प्रतीक असलेले सिंहचिन्ह आणि अशोकचक्रही त्यावर होते. त्यामुळे हा केवळ दगड-मातीचा बांधकामाचा भाग नसून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती जपणारे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात होते.

देखभालीकडे दुर्लक्ष; आता थेट तोडफोड

या ऐतिहासिक स्मृतीस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्तंभाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि परिसराची निगा राखण्याचे काम प्रशासनाकडून अपेक्षित असताना प्रत्यक्षात स्थानिक नागरिक आणि हुतात्म्यांचे नातेवाईकच पुढाकार घेऊन त्याची देखभाल करीत होते. विविध राष्ट्रीय व ऐतिहासिक दिनांच्या निमित्ताने येथे हुतात्म्यांना अभिवादनही केले जात होते.

प्रशासनाने या स्मृतीस्थळाची नियमित देखभाल करण्याऐवजी अखेर त्याच्यावर बुलडोझर फिरविल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. ज्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यांच्या स्मृतीचे जतन करता आले नाही; उलट त्यांचा स्मृतीस्तंभच जमीनदोस्त करण्यात आला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

निर्णय कोणी घेतला? कारवाई कधी?

स्मृतीस्तंभ पाडण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, तो पाडण्यापूर्वी हुतात्म्यांच्या नातेवाईकांना किंवा संबंधित नागरिकांना माहिती देण्यात आली होती का, तसेच स्तंभावरील हुतात्म्यांची नावे, संविधानाची उद्देशिका आणि राष्ट्रीय प्रतीके यांचे पुढे काय करण्यात आले, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी होत आहे.

या प्रकाराची चौकशी करून स्मृतीस्तंभ पाडण्याचे आदेश देणारे अधिकारी, प्रत्यक्ष कारवाई करणारे संबंधित कर्मचारी तसेच या निर्णयाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हुतात्म्यांच्या स्मृतीशी संबंधित स्थळांचे जतन करण्याऐवजी त्यांची अशी अवस्था होणे हा गंभीर प्रशासकीय प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात केवळ खुलासा न करता जबाबदारी निश्चित करून स्मृतीस्तंभाचे पुनर्स्थापन आणि योग्य पद्धतीने जतन करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Web Title: Marathwada liberation movement 17 martyrs memorial pillar demolished by bulldozer action demanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathwada

संबंधित बातम्या

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
1

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
2

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
3

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
4

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.