Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Virar Accident: विरार पूर्वेतील जांभूळपाडा गावात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव महिंद्रा थार थेट एका घरावर आदळल्याची घटना घडली. धडकेत घराची भिंत कोसळून घरमालक सुभाष जयराम सुतार जखमी झाले, तर घरासमोरील दोन दुचाकींचेही नुकसान झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 04:39 PM
भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • रात्री साडेअकराला मोठा आवाज अन् घराची भिंत कोसळली
  • विरारमध्ये भरधाव थारचा भीषण अपघात
  • चालकाचे नियंत्रण सुटले अन् थार घरावर आदळली
Virar Accident: विरार पूर्वेतील जांभूळपाडा गावात सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा थारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका घरावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत कोसळली आणि घरमालक सुभाष जयराम सुतार जखमी झाले. घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचेही या अपघातात नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. थारमधून अंकित मिश्रा (वय 26) आणि त्याचा मित्र राज यादव (वय 24) प्रवास करत होते. दोघेही नालासोपारा पूर्व परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. ते भाताणे येथून भालिवलीमार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जात होते.

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

सुभाष सुतार हे जांभुळपाडा येथील घर क्रमांक ४८/ब येथे पत्नी सुवर्णा व मुलगा आकाश यांच्यासह राहतात. त्यांच्या घरासमोर भालीवली ते भाताणेच्या दिशेने जाणारा सिमेंटचा रस्ता असून, घराच्या मुख्य दरवाजासमोर पत्र्याचे शेड आहे. या शेडखाली त्यांची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच ४८/सीव्ही ४१५२) आणि हिरो एक्स्ट्रीम (एमएच ४८/डीएल २८८१) या दोन दुचाकी उभ्या होत्या. रात्री ११.३० ते ११.४५च्या दरम्यान महिंद्रा थार (एमएच ४८/डीएक्स ७८९८) ही जीप भाताणेच्या दिशेकडून भालीवलीकडे जात होती.

थार जांभूळपाडा गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी थेट सुभाष सुतार यांच्या घराला जाऊन धडकली. या धडकेमुळे घराची भिंत कोसळली. भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने सुतार जखमी झाले. घराच्या अन्य भिंतींनाही तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींनाही थारची धडक बसल्याने त्यांचे नुकसान झाले. रात्री अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी थारमधील अंकित मिश्रा आणि राज यादव या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, याबाबतची अधिकृत वैद्यकीय पुष्टी अद्याप समोर आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून अपघात नेमका कसा झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाने मद्यपान केले होते का, यासह विविध बाबींचा पुढील तपास सुरू आहे.

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Web Title: Virar jambhulpada speeding mahindra thar crashes into house owner injured sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • virar

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड
1

Marathwada Mukti Sangram: हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभावर बुलडोझर! मराठवाडा मुक्तीसंग्रामातील 17 हुतात्म्यांच्या स्मारकाची तोडफोड

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…
2

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
3

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.