Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला मागेल ते मिळेल, पण…; दिलीप वळसे पाटलांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2025 | 12:30 AM
तुम्हाला मागेल ते मिळेल, पण...; दिलीप वळसे पाटलांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

तुम्हाला मागेल ते मिळेल, पण...; दिलीप वळसे पाटलांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

Follow Us
Follow Us:

मंचर : मंचर तालुका आंबेगाव येथे एसटी बस स्थानकासाठी पाच नवीन एसटी बस मिळाल्या असून, पुढील महिन्यात अजून पाच बस मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मंचर बस आगार आणि मंचर बस स्थानकासाठी मागेल ते मिळेल मात्र एसटी बस स्थानक सुंदर कसे राहील, याची काळजी घ्या, अशी सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी प्रशासनाला शनिवार दिनांक 10 रोजी केली आहे.

मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून मंचर एसटी आगारासाठी नवीन सुसज्ज पाच एसटी बस मिळाल्या असून, या एसटी बसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णू काका हिंगे पाटील , उद्योजकअजय घुले, प्रशांत बागल, भाजपाचे नेते संदीप बानखेले, भीमाशंकर चे संचालक मच्छिंद्र गावडे , खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले ,मुकुंद खुडे, सामाजिक कार्यकर्ते सुदाम बाळाजी पडवळ, लाला बँकेचे संचालक जे के थोरात, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश घनराळे, मंचर एसटी आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी, मंचर बस स्थानक प्रमुख साधना कालेकर यांच्यासह एसटीचे चालक वाहक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, मंचर एसटी आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे उत्पन्नात वाढ होते. मात्र आंबेगाव तालुक्यातील कॉलेज, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला तसेच भीमाशंकर परिसरातील आदिवासी नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मंचर एसटी आगाराला जास्तीत जास्त बस उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. मंचर बस आगार व्हावे, ही खूप दिवसापासूनची मागणी होती. ती दीड वर्षांपूर्वी मार्गी लागली. मात्र राजगुरुनगर, नारायणगाव आगार आपल्याला जवळ असल्याने मंचरला स्वतंत्र एसटी आगार मंजूर होत नव्हते. १२ ते १४ वर्षे कष्ट करून एस टी आगार मंजूर करून कार्यान्वित केले आहे. एसटी आगाराला कर्मचारी, एसटी गाड्या, डिझेलपंप, वर्कशॉप या सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. सर्व प्रवाशांना एसटी प्रशासनाने उत्तम सेवा द्यावी, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

भविष्यात जूने झालेले मंचर बस स्थानक पाडून या ठिकाणी नवीन सुविधायुक्त बस स्थानक बांधा आणि हस्तांतर करा, या तत्त्वावर उभारण्याचा मानस आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मदत घेऊन चांगले एसटी बस स्थानक बांधण्यात येईल. – दिलीप वळसे पाटील माजी मंत्री.

Web Title: Mla dilip walse patil has given important instructions to officers and employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Dilip Walse
  • Ncp Mla

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
2

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
3

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.