Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका सभागृहात मांडणार आहे. त्यासाठी विविध १५ मुद्यांवर आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 12:30 AM
मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, 'या' 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, 'या' 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

Follow Us
Close
Follow Us:
  • मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’
  • 15 मुद्यांवर लक्ष वेधणार
  • महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी महायुती सरकारने प्राधान्य दिले. त्यामुळे सरसकट शास्तीकर माफीपासून आंद्रा-भामा आसखेड सारखी जलसंजीवनी देणारी योजनापर्यंत पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्कांना न्याय मिळाला आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका सभागृहात मांडणार आहे. त्यासाठी विविध १५ मुद्यांवर आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

विकासकामांना गती, वाहतूक समस्यांवरील दीर्घकालीन उपाय, सार्वजनिक सुरक्षेशी निगडित प्रश्‍न, पायाभूत सुविधा, शिक्षण, जलपुरवठा, औद्योगिक वाढ इत्यादी विषयांवर ते एकूण १५ महत्त्वपूर्ण मुद्दे सरकारसमोर मांडणार आहेत. आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून मोकाट कुत्रे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी, प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियमांनुसार निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि त्यांना त्याच जागी सोडणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लांडगे यांनी राज्य सरकारने एकसंध आणि कडक धोरण जाहीर करून, मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जुन्नर व पुणे ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढत असून, अन्नाच्या अभावामुळे बिबटे मानवी वसाहतीत येत आहेत. त्यामुळे ज्या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आहे, त्यांना पकडून बिबटप्रवण क्षेत्रात सोडण्याची व्यवस्था केल्यास बिबट्यांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि मोकाट कुत्र्यांची समस्या कमी होण्यासही मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

वाहतूक सक्षमीकरण

पिंपरी-चिंचवड व पुणे महानगराच्या सभोवतालच्या भागात नागरिकरण आणि औद्योगिकरण प्रचंड वेगाने वाढत आहे. हिंजवडी आयटी हब तसेच चाकण–तळेगाव औद्योगिक पट्ट्यात दररोजची वाहतूक कोंडी भीषण स्वरुपात वाढली आहे. सरकार प्रयत्नशील असले तरी, अद्याप प्रकल्पांना अपेक्षित गती मिळालेली नाही. यामुळे आयटी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात नाराजी वाढत आहे. त्यामुळे सरकारकडे, वाहतूक समस्यांवरील सर्व प्रकल्प ‘फास्टट्रॅक’वर आणावेत, पुणे रिंगरोड प्रकल्पातील भूसंपादन अडथळे तातडीने दूर करावेत, राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण प्रक्रियेची गती वाढवावी, पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे–नाशिक महामार्गाचे रुंदीकरण व मिसिंग लिंकचे काम गतीमान करण्यासाठी महापालिका पातळीवर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, संपूर्ण वाहतूक समस्यांसाठी सरकारने कृतीशील, वेळबद्ध प्रकल्प आराखडा जाहीर करावा, याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

अधिवेशनात हे मुद्दे मांडणार

शिवचरित्र, जलपुरवठा, शिक्षण, उद्योग, प्राधिकरण विषयांसह इतर प्रमुख मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा लांडगे यांचा भर खालील मुद्द्यांवरही राहणार आहे. CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करणे. एमसीव्हीसी शिक्षक भरती तातडीने मंजूर करणे. PCNTDA च्या ८३७९ भूखंडांना फ्री-होल्ड लाभ मिळवून देणे. पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी आणि चासकमान धरणातून पाणी आरक्षण निश्चित करणे. मोशी येथे मेडीसिटी प्रकल्प उभारणे. पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राला छत्रपती संभाजी महाराज हे नामकरण करणे. आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी गृहयोजना प्रकल्पातील सदनिकाधारकांना दंडमाफी, कुदळवाडी–चिखली अतिक्रमणानंतर आयटी इंडस्ट्रीयल हब साठी धोरण ठरवणे. पीएमआरडीएमध्ये Education Hub (IIT–AIIMS–IIM झोन) साठी धोरणात्मक निर्णय घेणे. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना देणे. रेड झोन व ब्ल्यू लाईन रेडिरेकनर नियमावलीत सुधारणा यासह इव्हेंट–डेकोरेशन व्यवसायिकांसाठी वाहतूक नियम शिथिलता अशा मुद्यांवर अधिवेशनात लांडगेंकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. हिवाळी अधिवेशनात नागरिकांच्या सुरक्षेपासून वाहतूक, पाणी, शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणि प्राधिकरण विषयांपर्यंत सर्व मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना गती देण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकारकडून स्पष्ट व सकारात्मक निर्णय होतील, असा विश्वास आहे. – महेश लांडगे, आमदार

Web Title: Mla mahesh landge will raise many issues in the winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • mahesh landge

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद
1

CM Devendra Fadnavis: फडणवीस सरकारची ऐतिहासिक कामगिरी, एका महिन्यात ४५,९११ सौर पंप लावून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज; 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार
2

हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी शंकर जगताप सज्ज; 48 तारांकित प्रश्नांची यादी तयार

शिक्षक, शिक्षकेतर संघटना आक्रमक! शाळा बंद ठेवून पुण्यात मोर्चा; नेमकं मागण्या काय?
3

शिक्षक, शिक्षकेतर संघटना आक्रमक! शाळा बंद ठेवून पुण्यात मोर्चा; नेमकं मागण्या काय?

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस
4

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.