Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी; एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अनिल मकरिये यांची निवड झाली आहे. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा १०-४ अशा फरकाने पराभव केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 02:50 PM
भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी (Photo Credit- X)

भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी
  • एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अनिल मकरिये हे १० मते मिळवून विजयी झाले. त्यांनी एमआयएमचे उमेदवार खान अब्दुल मतीन यांचा सहा मतांनी पराभव केला. तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

मनपा मुख्यालयात सकाळी ११ वाजता पिठासन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापतीपदासाठी भाजपचे अनिल मकरिये आणि एमआयएमचे खान अब्दुल मतीन यांच्यात थेट लढत झाली. अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला; मात्र कोणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानात भाजपच्या आठ आणि शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांनी मकरिये यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांना एकूण १० मते मिळाली.

Samruddhi Highway Accidents: वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय ‘मृत्युमार्ग’! चार वर्षांत १ हजार ३९९ अपघात; तर ११२ जणांचा…

एमआयएमचे अब्दुल मतीन यांना चार मते मिळाली. तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी मतदानापासून दूर राहत तटस्थ भूमिका घेतली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती अनिल मकरिये यांचा मनपा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, भाजपचे किशोर शितोळे उपस्थित होते.

कर नाही तर विकास नाही: अनिल मकरिये

मकरिये यांनी मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले. ज्या भागातील नागरिक मालमता कर भरणार नाहीत, त्या भागात विकासकामांना प्राधान्य दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच इंदोरच्या धर्तीवर शहर विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरात मल्टीपल पार्किंगची सुविधा उभारण्यावरही भर दिला जाईल. विकासकामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Chhatrapati Sambhajinagar: रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला; भाडेवाढीसाठी RTO कडे धाव

Web Title: Bjps anil makariye wins standing committee chairperson post mim candidate defeated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • BJP
  • Chhatrapati Sambhajinagar
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.