'राज ठाकरे यांचा तसा वापर होऊ नये'; जाणून घ्या रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विधान केले. ‘भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. राज ठाकरे यांचा तसा वापर होऊ नये’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या गटात होणार सामील? आगामी निवडणूकीमुळे राजकारण रंगले
रोहित पवार यांनी नागपुरात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातिवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर ते म्हणाले, ‘राज ठाकरे हे मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे भाजप त्यांचा वापर फक्त मत खाण्यासाठी करून घेईल, ते फक्त होऊ याची काळजी राज ठाकरे यांनी घ्यावी’.
तसेच भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. राज ठाकरे यांचा तसा वापर होऊ नये. ते मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यामुळे भाजप त्यांचा वापर फक्त मत खाण्यासाठी करून घेईल, ते फक्त होऊ याची काळजी राज ठाकरे यांनी घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
भाजप कशाचे अन् कुठे आंदोलन करते, हे पण त्यांनाच कळत नाही
भाजप कशाचे आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांनाच कळत नाही. वरुन आदेश आला की इथे नाचत बसतात. राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही. अशावेळी भाजपाचे लोक काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहेत. कुठे आंदोलन करायचे आणि कशाचे करायचे नाही, हेसुद्धा भाजपाच्या लोकांना कळत नाही.
– रोहित पवार, आमदार