Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर कुटुंबासह ‘शिवतीर्थ’ वर; राज ठाकरेंसह केली बाप्पाची पूजा

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सहकुटुंब आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे भेट दिली. तेंडुलकरने राज ठाकरे यांच्या घरी गणपती पूजा केली. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 28, 2025 | 06:36 PM
Cricket god Sachin Tendulkar with family at 'Shivatirth'; worshipped Bappa with Raj Thackeray

Cricket god Sachin Tendulkar with family at 'Shivatirth'; worshipped Bappa with Raj Thackeray

Follow Us
Close
Follow Us:

Sachin Tendulkar visits Raj Thackeray’s house: राज्यातच नाही तर पूर्ण देशभर गणेशोत्सव सजरा केला जाता आहे. या उत्सवात अनेक दिग्गज एकमेकांच्या घरी भेट देऊन गणपतीची पूजा करताना दिसून येतात. यामध्ये राजकीय नेत्यांपासून ते क्रिकेट मधील मोठ्या खेळाडूंचा सहभाग दिसून येतो. अशातच भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह भेट दिली. यावेळी गणपती पूजा करण्यात आली. या दरम्यान सचिन तेंडुलकरकडून राज ठाकरे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेण्यात आली.

सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचे नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. सचिनने देखील या गोष्टीला दुजोरा दिला. सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुनने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेव्ही ब्लू डिझायनर कुर्ता परिधान केलेला दिसून आला. तर त्याची पत्नी अंजली लाल साडी नेसलेली होती. गणपती दर्शनानंतर, तेंडुलकर कुटुंबाने ‘शिवतीर्थ’ येथील गणपतीच्या मूर्तीसमोर राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत फोटो देखील काढले.

हेही वाचा : Asia cup 2025 : गौतम गंभीरची १५ वर्षांनंतर ‘ती’ इच्छा पूर्ण होईल का? आशिया कपमधील हेड कोचची आकडेवारी काय सांगते?

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला आहे. त्यांच्या घरी अनेक राजकीय आणि चित्रपट जगतातील मान्यवर दर्शनासाठी येत आहेत. सचिन तेंडुलकरच्या आधी बॉलीवूड अभिनेता आमिर खान राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी आल्याचे दिसले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती पूजा

तेंडुलकरच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थिती दर्शवली. या दरम्यान त्यांनी  गणपतीची पूजा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत लिहून माहिती दिली. त्यांनी लिहिले की,  त्यांनी मुंबईतील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भगवान गणेशाचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले, सतेच सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना देखील  केली.

हेही वाचा : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने आखले नवे प्लॅन! BCCI साठी पार पाडू शकतो ‘ही’ जबाबदारी

२० वर्षांनंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांच्या घरी भेट

२० वर्षांनंतर शिवसेना-यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही देखील त्यांच्या कुटुंबासह चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन  गणपती पूजा केली. गणपती उत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. राज ठाकरे यांचे म्हणणे  मान्य करून उद्धव ठाकरे कुटुंबासह बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहचले.

 

Web Title: Sachin tendulkar worships bappa at raj thackerays house with family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • Ganesh Utsav 2025
  • raj thackeray
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती
1

समस्त गावकरी मंडळाची 82 वर्षांची परंपरा; व्ही. शांताराम यांच्याकडून लाभलेली मूर्ती

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले
2

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
3

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Arjun-Sania Engagement : ‘हो, तो साखरपुडा झालाय’, अखेर सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या नात्याला दुजोरा.. 
4

Arjun-Sania Engagement : ‘हो, तो साखरपुडा झालाय’, अखेर सचिन तेंडुलकरने दिला अर्जुन-सानियाच्या नात्याला दुजोरा.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.