Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmaveer Anand Dighe: “आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर…” संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर २’ अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपट २७ सप्टेंबर देशासह परदेशात रिलीज झालेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2024 | 01:52 PM
Dharmaveer Anand Dighe: "आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर...'' संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

Dharmaveer Anand Dighe: "आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर...'' संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. धर्मवीर’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘धर्मवीर २’ आला आहे. मात्र या चित्रपटावरून राज्यात राजकारण केले जात आहे.  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने विरोधक हा विषय उचलून धरत आहेत. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काल दिघे साहेब यांना मारले गेले हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. दरम्यान आजही त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. दिघे साहेब किंग होतयात हे कोणाला तरी खुपत होते, असे विधान शिरसाट यांनी केले आहे,

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ”मी काल आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केले आहे. त्यावर राज्यभर प्रतिक्रिया आल्या. मात्र मला जी शंका वाटली त्यावर मी बोललो. दिघे साहेब यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे अतोनात प्रेम होते. दिघे साहेबांनी कधीही बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिंमत केली नाही. मात्र दिघे साहेब किंग होतयात याची खुन्नस काही जणांना वाटत होती. त्यामुळे हे सर्व झाले.”

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ”आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर आपल्याला अडचण होऊ शकते, अशा लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण उघड करण्याची ताकद ठेवतो. आज ती लोक त्यावेळेस केले तसे राजकारण करत आहेत. त्या लोकांमुळेच राणे, भुजबळ, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडलेली लोक शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात नव्हती. इतर काही जणांमुळे ती गेली.एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांना नक्षल्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. एवढ्या धमक्या येऊनही त्यांना सुरक्षा का पुरवली गेली नाही? मात्र शिंदे खंबीर होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे या मागचे नक्की काय कारण होते? ”

‘धर्मवीर २’ची धमाकेदार सुरूवात

 

स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर २’ अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपट २७ सप्टेंबर देशासह परदेशात रिलीज झालेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच झी स्टुडिओज कडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांनी ” ‘धर्मवीर २’ मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद दिला आहे. मुख्य बाब म्हणजे चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २०२४ या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १ कोटी ९२ लाखांची कमाई केलेली आहे.

 

Web Title: Mla sanjay shirsat criticizes on opponents for dharmaveer anand maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 05:25 PM

Topics:  

  • Dharamveer Anand Dighe
  • Eknath Shinde
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
2

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
3

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.