Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अर्वाच्च भाषेत बोलल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांचा अपमान करण्याचा संजय दिना पाटील यांचा हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले असले,

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 04:44 PM
संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  •  संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
  • “जर कोणतेही शब्द अनुचित असतील, तर माफी मागा.”
Eknath Shinde On Sanjay Patil : खासदार संजय दिना पाटील यांनी दोन दिवसापूर्वी बंडखोर करत शिवसेना (उद्धव ठाकरे) सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांच्यावर पत्रकारांशी असभ्य भाषा वापरून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या कथित वक्तव्यामुळे विविध स्तरांवर संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी अपमानास्पद बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, त्यांनी पाटील यांना पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला.

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेईन आणि मग सविस्तर बोलेन. पण मी नुकतेच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितले की पत्रकारांबद्दल कोणतीही नकारात्मक टिप्पणी करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांचे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत आणि कोणत्याही पत्रकाराच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता.”

“जर कोणतेही शब्द अनुचित असतील, तर माफी मागा.”

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “जे दररोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्याबाबत अपशब्द बोलतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवा, अशा पद्धतीने खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, मग तो देखील मीडियाचा अपमान आहे. हे बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि त्यामुळेच संजय दीना पाटील संतप्त झाले होते. पण त्यांच्या मनात पत्रकारांबद्दल कोणताही द्वेष नव्हता. कोणत्याही लोकप्रतिनिधीने पत्रकारांबद्दल अशी वक्तव्ये करू नयेत. त्यामुळे, मी त्यांना पत्रकारांशी बोलून, जर त्यांनी त्यांच्याबद्दल काही अनुचित शब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे.”

संजय दीना पाटील काय म्हणाले?

“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला होता.

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

Web Title: Eknath shinde reacts to sanjay dina patil controversy asks him to apologise to journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Dina Patil
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.