Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

Maharashtra Politics: निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या या लोकप्रतिनिधीनी स्वतःला मिळालेला निधीच वेळेत खर्च केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही खासदारांना १४ ते १९ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यातील केवळ काही लाख किंवा १-२ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 12:28 PM
ShivSena Split, Eknath Shinde, Uddhav Thackeray, MP Funds, Political Expose, Maharashtra Politics,

ShivSena Split, Eknath Shinde, Uddhav Thackeray, MP Funds, Political Expose, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:

 

  • उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करताना केलेला निधीचा दावा खाजगी वृत्तसंस्थेच्या आकडेवारीने खोटा ठरवला आहे.
  • निधी असूनही तो वेळेत खर्च न केल्यामुळे, पक्षांतरासाठी दिलेले कारण केवळ एक ‘राजकीय बहाणा’ असून हा निर्णय वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठीच घेतला
  • मंजूर झालेला निधी वेळेत लोकहिताच्या कामांसाठी वापरण्यात हे लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Politics: मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळत नाही, त्यामुळे कामे खोळंबली आहेत आणि जनतेची कामे करण्यासाठीच आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहोत, असा दावा करत काल ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, या खासदारांचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे. खाजगी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या खासदारांना केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु त्याचा योग्य वापर करण्यात हे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

‘तो’ केवळ राजकीय बहाणा

निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या या लोकप्रतिनिधीनी स्वतःला मिळालेला निधीच वेळेत खर्च केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही खासदारांना १४ ते १९ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मंजूर झाला होता, मात्र त्यातील केवळ काही लाख किंवा १-२ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. अनेक ठिकाणी तर ४० पैकी एकही काम पूर्ण झालेले नाही, तर कुठे १३५ कामांपैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, पक्षांतरासाठी विकास निधी न मिळण्याचे दिलेले कारण केवळ एक राजकीय बहाणा असून, वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

माझ्या मागील ५ वर्षांच्या कार्यकाळातील एकही 66 अखर्चित राहिलेला नाही आणि सध्याच्या निधीचे मूल्यमापन आताच करणे चुकीचे आहे, तुम्ही माझे मूल्यमापन करत असाल, तर माझ्या पहिल्या टर्मचे (२०१९ ते २०२४) करा, या ५ वर्षात ओमराजे निंबाळकर यांना मिळालेल्या खासदार निधीमधला एक पैसाही अखर्चित राहिलेला नाही, याची माहिती कुणीही ‘एमपीएलएडी’च्या अधिकृत वेबसाईटवरून काढू शकते. सध्याच्या (२०२४-२९) कार्यकाळाचे मूल्यमापन २०२९ च्या मार्चनंतर करा, तेव्हा जर निधी शिल्लक राहिला तर मला जाब विचारा.
ओमराजे निंबाळकर, खासदार

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड

संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व): मंजूर निधी १४.७ कोटी, खर्च १५.१६ लाख.
नागेश आष्टीकर (हिंगोली): मंजूर निधी १४.७ कोटी (प्रलंबित प्रकल्पांच्या मुद्यावरून चर्चेत).
ओम राजेनिंबाळकर (धाराशीव): मंजूर निधी १८.५ कोटी, खर्च ३.७८ कोटी.
संजय जाधव (परभणी): मंजूर निधी १४.७ कोटी, खर्च १.९७ कोटी.
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी): मंजूर निधी १४.७ कोटी, खर्च ७१ लाख.
संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम): मंजूर निधी १४.७ कोटी.

 

 

 

 

Web Title: Maharashtra politics six defection mps claims on development funds exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
1

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
2

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
3

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.