Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटच्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करत, हा नव्या भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार असल्याचे म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 05:00 PM
जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-रशिया-चीनच्या बलाढ्य नेत्यांना मोदींनी टाकले मागे
  • भारताच्या वाढत्या ताकदीवर जगाने उमटवली विश्वासाची मोहोर
  • लोवी इन्स्टिट्यूटच्या जागतिक सर्वेक्षणात मोदी अव्वल
  • ट्रम्प, पुतिन आणि जिनपिंग यांच्यापेक्षाही मोदींच्या प्रभावी नेतृत्वाची नोंद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाच्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक पटावर अशी मुसंडी मारली आहे की, आता महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तब केले असून, जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करत, “हा केवळ मोदींचा विजय नसून नव्या भारताच्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार आहे,” असे म्हटले आहे.

या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांनाही मोदी यांनी मागे टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन किती बदलला आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मोदी यांनी “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची ओळख केवळ विकसनशील देश म्हणून राहिलेली नाही, तर जागतिक घडामोडींना दिशा देणाऱ्या प्रभावी शक्ती म्हणून निर्माण झाली आहे. जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भारताची भूमिका आता निर्णायक मानली जात आहे. एकेकाळी महासत्तांच्या निर्णयांचा प्रभाव स्वीकारणारा भारत आज जागतिक शक्ती-संतुलन घडविणाऱ्या देशांच्या पहिल्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे.

‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या अहवालातील आकडेवारीनुसार जागतिक शक्तीच्या समीकरणांमध्ये भारताची झेप लक्षणीय ठरत असून, चीन, अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरी या सर्व क्षेत्रांत भारताने केलेली प्रगती जगाला आश्चर्यचकित करणारी असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले की, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. देशाचा सन्मान, स्वाभिमान आणि सामर्थ्य वाढविण्याचे काम मोदी यांनी सातत्याने केले आहे. “आज जग भारताकडे केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर भविष्यातील जागतिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्राच्या नजरेने पाहत आहे. ही बदललेली प्रतिमा आणि वाढलेला प्रभाव मोदी यांच्या अथक परिश्रमांचा व राष्ट्रहिताला दिलेल्या सर्वोच्च प्राधान्याचा परिणाम आहे,” असेही शिंदे म्हणाले.

या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “भारताला विश्वगुरूपदाच्या दिशेने नेणाऱ्या या नेतृत्वाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा तिरंगा केवळ देशातच नव्हे तर जागतिक व्यासपीठावरही अधिक उंच फडकत आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मविश्वासाचा आणि नव्या भारताच्या उदयाचा आहे.”

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

Web Title: Pm narendra modi tops global leadership survey lowy institute eknath shinde reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Eknath Shinde
  • narendra modi

संबंधित बातम्या

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
1

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे
2

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
3

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी
4

Iran-US War : ‘…तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू’; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.