Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शासनाकडून 316 कोटींची उधळपट्टी!” संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे हे अधिवेशनात आक्रमक झाले आहे. त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला होता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 04:34 PM
संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे आक्रमक
  • शासनाकडून 316 कोटींची उधळपट्टी
  • राज्य सरकारवर टीका
संगमनेर मार्गे होणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वे करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर रेल्वे मंजूर होऊन 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले. आता रेल्वे मार्ग का बदलला गेला? असा प्रश्न विचारत, नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे, अशी आग्रही आणि आक्रमक मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी नागपूर अधिवेशनात केली.

या हिवाळी अधिवेशनात नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आमदार सत्यजित तांबे आणि आक्रमकपणे उचलून धरला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तालिका सभापती कृपाल तुमाने होते तर विविध मंत्री व इतर सदस्य सभागृहामध्ये उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे करता बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून रेल्वे मंजूर झाली. राज्य शासन महारेल विभागाच्या वतीने रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले.

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महाबळेश्वरचा फील! पार थेट ७ अंशांपर्यंत घसरले

रेल्वेमार्गाकरता 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण

तांबे म्हणाले, या रेल्वेमार्गाकरता 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 316 कोटी रुपये खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता मार्ग बदलण्याचा घाट घातला जात आहे. नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड चाकण असा हा मार्ग अत्यंत गरजेचा आणि
योग्य आहे.

या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ला त्याचबरोबर अष्टविनायकांमधील ओझर आणि लेण्याद्री हे तीर्थस्थळ सुद्धा जोडता येणार आहे. मात्र आता शिर्डी अहिल्यानगर हा मार्ग कोणत्या उद्देशाने झाला. हे काही कळत नाही. या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून हा मार्ग संगमनेर मार्गेच केला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ३१६ कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारने जी १०० हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. त्याचे राज्य सरकार काय करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार

नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच झाली पाहिजे

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वपक्षीय नागरिकांची बैठक घेतली असून, या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची ते बैठक घेणार आहेत. सोशल मीडिया कॅम्पेन, सह्यांची मोहीम, ऑनलाइन ई-मेल असे जन आंदोलन सुरू असून, अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार तांबे यांनी आक्रमक पद्धतीने रेल्वेची मागणी लावून धरली आहे. राजकारण न करता सर्वांनी संगमनेर मार्गे रेल्वे करता पाठिंबा द्यावा असे आवाहन रेल्वे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Mla satyajit tambe on sangamner railway route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Sangamner
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन
1

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
2

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
3

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची
4

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.