फोटो सौजन्य: Gemini
या वर्षी पावसाने राज्यासह देशभरात कहर केला होता. अनेक ठिकाणी महापूरही लोटले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान देशाने पाहिले. पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळे यंदा कडाक्याची थंडी पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दसरा-दिवाळी होऊन गेली तरी म्हणावी अशी थंडी जाणवली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर नागरिकांना हुडहुडी भरायला लावतो आहे.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
कोल्हार भगवतीपूर परिसरदेखील कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे ऊबदार कपड्यांना मागणी वाढली असून चहा-कॉफीच्या टपऱ्यांवर लोकांची गर्दी दिसत आहे. जनतेला गारठवणारी ही थंडी रब्बीतील पिकांसाठी मात्र पोषक असल्यामुळे कोल्हार भगवतीपूर परिसरातील शेतकऱ्यांची गव्हाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे.
सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली
राज्यभरातच नागरिकांना सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील काही भाग वगळता अनेक ठिकाणी किमान तापमान ७ अंशापर्यंत घसरल्याने दिवसादेखील काही ठिकाणी नागरिक शेकोटीच्या उबेला बसल्याचे चित्र दिसत आहे. सूर्यकिरणांची उबदार शाल पांघरून ते थंडीपासून बचाव करीत आहेत. आकाशात सूर्य असेपर्यंत वातावरणात उष्णता राहते. त्यामुळे हुडहुडी भरण्याएवढी थंडी जाणवत नाही. सूर्य मावळतीला गेल्यावर मात्र अघोषित संचारबंदी सुरू होते.






