Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’! आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळु रूमहामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्या संदर्भातील कामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2025 | 12:33 PM
वाकड ते मामुर्डी रस्ता होणार 'सुसाट'! आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार 'सुसाट'! आमदार शंकर जगतापांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

Follow Us
Close
Follow Us:
  • वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’!
  • आमदार शंकर जगतापांचा पुढाकार
  • अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

पिंपरी : चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळु रूमहामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्या संदर्भातील कामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. या सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. आवश्यक ठिकाणी जागा हस्तांतरित करून मूलभूत सेवा सुविधांची विकास कामे देखील पूर्ण करावी, अशा सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने मुळा नदी ते भुमकर चौक आणि भुमकर चौक ते मुळा नदी हा गोल सर्कल हा मार्ग प्राधान्याने पूर्ण केला जावा. यामधील पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी निचरा व्यवस्था, विविध सेवा वाहिन्यांसाठी डक्ट सुविधा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे यांसारख्या सूचना देखील आमदार जगताप यांनी दिल्या आहेत.

चिंचवड मतदार संघातील पिंपळे गुरव येथील कार्यालयात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील सेवा रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी आमदार जगताप यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील, तसेच हरिंद्र यादव आदी उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, चिंचवड मतदार संघात येणाऱ्या ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्‌याने वाढ झाली आहे. या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत आहेत. येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे , मुंबई बेंगलोर हायवे लगत असणारा सर्व्हिस रस्ता हा या परिसरातील शालेय विद्यार्थी, आयटी, व औद्योगिक कामगार वर्ग, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या रोजच्या प्रवासासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आली. चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळुरू महामार्ग आणि सेवा रस्ता हा राज्य शासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. येथील सबवे व रस्ता राज्य शासन व केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (मॉर्थ) यांच्या कार्यक्षेत्रात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन सूचना केल्या.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, भुमकर चौक ते ताथवडे , ताथवडे ते पुनावळे अंडरपास येथील सेवा रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करून देण्यात यावे. या माध्यमातून वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ते चांगले असल्यास येथील वाहतुकीचा स्पीड देखील वाढेल. येथील रस्त्यांच्या कामांसाठी ज्या जागा अद्याप ताब्यात आलेल्या नाही यासंदर्भात जागामालक शेतकरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत या जागामालकांनी चर्चा केली असून, भूसंपादनाचा विषय देखील मार्गी लावण्यात आला आहे. या रस्त्यांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची राखण्यात यावी. पुढील पन्नास वर्षाचे व्हिजन या कामांसाठी दिले जावे. जेणेकरून भविष्यात वारंवार रस्त्यांच्या गुणवत्तेचे प्रश्न उपस्थित राहू नये असे अशा सक्त सूचना केल्या असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. पुनावळे, ताथवडे, वाकड अंडरपास येथे “बॉक्स पुशअप” बसवण्यासंदर्भात तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार आहे, त्यानंतर तातडीने निविदा काढून हे काम पूर्ण करण्यात येईल असे देखील जगताप यांनी सांगितले.

Web Title: Mla shankar jagtap has given important instructions to the officials regarding road work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये
1

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये

राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?
2

राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यातून चोरी; पत्नीला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यातून चोरी; पत्नीला चाकूचा धाक दाखवला अन्…

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
4

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.