Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

वरणगाव शहराजवळील फुलगाव उड्डाणपुलाखाली एका २४ वर्षीय तरुणावर सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत लोखंडी रॉड व दांडक्यांनी बेदम मारहाण केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 01:42 PM
वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्...

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्...

Follow Us
Follow Us:
  • उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या
  • तरुणीला भेटायला आला अन् घात झाला 
  • वरणगाव परिसरातील घटनेनं खळबळ
वरणगाव : वरणगाव शहराजवळील फुलगाव उड्डाणपुलाखाली एका २४ वर्षीय तरुणावर सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत लोखंडी रॉड व दांडक्यांनी बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या खांद्याला व पोटात गोळ्या लागल्या असून डोके, हात आणि पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. सरफराज सैय्यद सकीर सैय्यद (२४, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) असे जखमीचे नाव आहे. रविवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

सरफराज हा भुसावळ येथील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. त्याची महिनाभरापूर्वी इन्स्टाग्रामवरून अश्विनी नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. रविवारी तो मुक्ताईनगरला घरी जात असताना दोघांचे मोबाईलवर बोलणे झाले. त्यानुसार फुलगाव उड्डाणपुलाखाली भेटण्याचे ठरले. सरफराज तेथे थांबलेला असताना सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी मागून येत त्याच्या डोक्यावर रॉडने प्रहार केला. तो खाली कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी हात व पायावरही मारहाण केली. त्यानंतर एकाने गावठी कट्ट्यातून खांद्यावर आणि पोटात गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

जिल्हा रूग्णालयात शर्थीचे उपचार सुरू

जखमी सरफराजला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. गोविंदा बेलदार यांनी प्राथमिक उपचार केले. पोटातील गोळी खोलवर रुतल्याने ती काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

हे सुद्धा वाचा : हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

संशयितांच्या मागावर आहेत पोलिस पथके

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली आणि घटनास्थळी धाव घेतली. मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. जखमीच्या फिर्यादीवरून सात ते आठ अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११८ (२), १८९ (४) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वरणगाव गोळीबार प्रकरणात जखमी तरुण कोण आहे आणि हल्ला कधी झाला?

    Ans: जखमी तरुणाचे नाव सरफराज सैय्यद सकीर सैय्यद (वय 24, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) आहे. तो भुसावळ येथे चालक म्हणून काम करतो. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता वरणगाव जवळील फुलगाव उड्डाणपुलाखाली हा हल्ला झाला. तो अश्विनी नावाच्या तरुणीला भेटायला आला होता.

  • Que: हल्ला कसा करण्यात आला आणि तरुणाची सध्याची प्रकृती कशी आहे?

    Ans: 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी मागून येऊन सरफराजच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला, नंतर हात-पायावर मारहाण करून गावठी कट्ट्यातून खांद्यावर आणि पोटात दोन गोळ्या झाडल्या. पोटातील गोळी खोलवर रुतल्याने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात काढता आली नाही, त्यामुळे त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: वरणगाव पोलिसांनी जखमीच्या फिर्यादीवरून 7 ते 8 अज्ञातांविरुद्ध BNS कलम 109(1), 118(2), 189(4) आणि शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगर SDPO यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: An incident involving a shooting at a young man has occurred near varangaon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!
2

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?
3

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
4

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.