
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून आयुक्त सुनील पवार यांची कल्पना आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेसाठी ७६ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून अनेक विकासकामे करणे शक्य असल्याचे आयुक्त सुनील पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वेळीच परिपूर्ण प्रस्ताव बनवून सुधीर गाडगीळ यांच्यामार्फत निधी प्राप्त होण्यास प्रयत्न सुरू केले होते.
त्यानुसार आज एकूण सुमारे ७६ कोटी ५१ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळून त्यातील ४६ कोटी ५१ लाख रुपये वितरणाचा आदेश पारित झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.
सांगली महानगरपालिकामधील विकासकामासाठी…
१) कुपवाड वारणाली येथे मल्टिस्पेशालीटी हॉस्पीटल विकसीत करणे. ६ कोटी
२) सांगली येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्ग (१०० फुटी रोड) विकसित करणे.१५ कोटी १७ लाख
३) सांगली येथील अहिल्यादेवी होळकर चौक ते साखर कारखाना कंपाऊंड रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे. ३ कोटी ५६ लाख
४) कुपवाड येथील महावीर रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी देऊळ चौक रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे. ३ कोटी ८४ लाख
५) कुपवाड मंगळवार बाजार कल्वर्ट ते जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे- एक लाख
६) कुपवाड येथील आनंद पार्क बस स्टॉप ते शिव मंदिरपर्यंत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे. ८४ लाख
७) कुपवाड रामकृष्ण नगर एस.टी कॉलनी ते अहिल्यानगर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे. ९ कोटी ३७ लाख
८) कुपवाड प्रभागातील जाधव एजन्सी विजयनगर रोड ते राहिदास नगर पाण्याची टाकी पर्यतचा पु+प रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे. २कोटी २२ लाख
९) सांगली वॉर्ड क्र.१२ मधील माधवनगर रोड ते गोसावी गल्ली ते मॉडर्न इंग्लिश स्कूल पर्यंतचा रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे. १ कोटी ५३ लाख
१०) सांगली येथील विद्यानगर हौसिंग सोसायटी वारणाली येथे विद्या उद्यान विकसित करणे. २ कोटी ९९ लाख
११) सांगली येथील एकता नगर येथे फलोद्याने विकसित करणे. १ कोटी ९९ लाख
१२) सांगली येथील अंतीम भूखंड क्र. अ धर्मशाळा/मनपा ऑफिस / अतिथीगृह येथे सांगली मिरज कुपवाड
महानगरपालिकेचे व्यापारी संकुल व प्रसुतिगृह विकसित करणे. २५कोटी ८७ लाख
१३) सांगली येथील मनपा ऑफिस ते टिळक चौक ते गणपती मंदिर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे १ कोटी १२ लाख असे एकूण ७६ कोटी ५१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी आयुक्त सुनील पवारांनी असेच नवनवीन योजनांचा आराखडा बनवावा, त्यासाठी निधी आणण्याची व्यवस्था वैयक्तिक लक्ष देऊन शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ व सांगली लोकसभा प्रभारी शेखर इनामदार यांनी दिली.