Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Make In India : भक्तीच्या भूमीत शक्तीचं नवं केंद्र; शिर्डीत उभारलं देशातील सर्वात मोठं प्रायव्हेट डिफेन्स क्लस्टर

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे बळ देत शिर्डीत देशातील सर्वात मोठ्या खासगी डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले आहे. भक्तीची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत आता संरक्षण क्षेत्रातील नवे शक्तीकेंद्र उभे राहत असून देशाच्या संरक्षण सज्जतेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2026 | 06:37 PM
भक्तीच्या भूमीत शक्तीचं नवं केंद्र; शिर्डीत उभारलं देशातील सर्वात मोठं प्रायव्हेट डिफेन्स क्लस्टर

भक्तीच्या भूमीत शक्तीचं नवं केंद्र; शिर्डीत उभारलं देशातील सर्वात मोठं प्रायव्हेट डिफेन्स क्लस्टर

Follow Us
Follow Us:
  • ‘मेक इन इंडिया’ला मोठं बळ!
  • शिर्डीत देशातील सर्वात मोठ्या खासगी डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन
  • देशाच्या सज्जतेला बळ देणाऱ्या डिफेन्स क्लस्टरची सुरुवात
पोपट पिटेकर, शिर्डी : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या आणि ‘आत्मनिर्भरतेच्या’ दिशेने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली. या भव्य प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेला अभूतपूर्व ताकद मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला मोठी गती मिळणार आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार ‘या’ App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली

या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाहणी दौऱ्यावेळी देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणि राज्य शासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भक्तीच्या भूमीत आता ‘संरक्षण शक्तीचे’ हे नवे केंद्र देशाच्या अभिमानाचा विषय ठरत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे केंद्र

शिर्डीतील या अत्याधुनिक आणि भव्य डिफेन्स क्लस्टरमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भारतीय लष्कराला अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी या प्रकल्पात खालील प्रमुख घटकांची निर्मिती केली जाणार आहे..

अत्याधुनिक क्षेपणास्त्रे: क्षेपणास्त्रांची अत्याधुनिक डिझाईन आणि थेट निर्मिती येथे केली जाईल.

भव्य दारुगोळा पार्क: लष्करासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दारुगोळ्याचे एक विशाल पार्क या अंतर्गत विकसित केले आहे.

आधुनिक ड्रोन्स:  युद्धाच्या काळात देखरेख ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त ठरणारे हाय-टेक ड्रोन्स येथे बनवले जातील.

युद्धभूमीवरील साधने: प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांचे रक्षण करणारी आणि शत्रूवर मात करणारी अत्याधुनिक संरक्षण साधने या प्रकल्पात उत्पादित केली जाणार आहेत.

हजारो कोटींची गुंतवणूक आणि रोजगाराची मोठी संधी- या मेगा प्रोजेक्टसाठी खाजगी क्षेत्राकडून हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे केवळ देशाची सीमाच सुरक्षित होणार नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस

या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा आणि इतर सेवांच्या माध्यमातून मोठी चालना मिळेल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या आणि कौशल्याच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक प्रगतीत एक ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे.

जागतिक नकाशावर शिर्डीचे नाव आतापर्यंत भारताला अनेक अत्याधुनिक संरक्षण साधनांसाठी परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, शिर्डीतील हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर भारताचे परदेशांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होणार असून, भारत संरक्षण साहित्याचा मोठा उत्पादक देश म्हणून समोर येईल. साईनगरी शिर्डी आता केवळ धार्मिक पर्यटनासाठीच नाही, तर जागतिक संरक्षण उत्पादन नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून ठळकपणे उदयास येणार आहे, असा विश्वास या पाहणी दौऱ्यादरम्यान व्यक्त करण्यात आला.

Mumbai News: राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार! देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले

Web Title: Make in india boost shirdi largest private defence cluster inauguration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • Make in India
  • shirdi

संबंधित बातम्या

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
1

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
2

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
3

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
4

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.