Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार विश्वनाथ भोईर यांचा केडीएमसी प्रशासनाला अल्टीमेटम, आयुक्तांसोबत पार पडली बैठक

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता, रिंगरोडचे, स्मार्टसिटीचे काम आदी प्रमूख मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेत हे अल्टीमेटम दिले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 06, 2024 | 12:41 PM
आमदार विश्वनाथ भोईर यांचा केडीएमसी प्रशासनाला अल्टीमेटम, आयुक्तांसोबत पार पडली बैठक
Follow Us
Follow Us:

कल्याण : गणेशोत्सवाला एक दिवस शिल्लक राहिला आहे, त्यामुळे आता रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर खड्डे असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे. याचकारणामुळे आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची बैठक पार पडली, यावेळी गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी कल्याणमध्ये रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे काहीही करून भरण्याचे अल्टीमेटम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले गेले नाहीत, तर आम्ही शिवसैनिक आहोत जे काही करायचे ते आम्ही करूच अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची कानउघाडणी केली. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता, रिंगरोडचे, स्मार्टसिटीचे काम आदी प्रमूख मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेत हे अल्टीमेटम दिले.

हेदेखील वाचा – दुलीप ट्रॉफीमध्ये शतक ठोकणारा मुशीर खान IPL 2025 मध्ये या संघामधून खेळणार, लिलावापूर्वी मोठा खुलासा

कल्याणचा सार्वजनिक गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कल्याणातील गणेशोत्सव आणि त्यात सादर केलेले देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे कल्याण शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. तसेच कल्याण शहर हे नावाला नाही तर प्रत्यक्षात खरोखर हे शहर स्मार्ट वाटले पाहिजे, सर्व रस्ते व्यवस्थित दिसले पाहिजेत, सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे असेही त्यांनी या बैठकीत केडीएमसी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.

या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, संजय पाटील, सुनिल वायले, जयवंत भोईर, मोहन उगले, विद्याधर भोईर यांच्यासह नितीन माने, विजय देशेकर, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील आणि केडीएमसीचे प्रमूख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mla vishwanath bhoir gave an ultimatum to kdmc administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?
2

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
3

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
4

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.