
ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
या प्रकरणात डॉ. साली यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साली हेदेखील आरोपी आहेत. तक्रारदारांचे वकील ॲड. हरीश नायर यांनी सांगितले की, सत्र न्यायालयाने वैशाली यांचा अटकपूर्व जामीन अर्जही यापूर्वीच फेटाळला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, तिथे त्यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी एपीआय विजय गायकवाड यांनी माहिती दिली की, 13 सप्टेंबर 2025 रोजी डॉ.राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात डॉ.साली दाम्पत्याविरुद्ध 70 लाखांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान गणेश पाटील आणि धनश्री गोडांबे यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर एपीआय गायकवाड यांनी न्यायालयात जामिनाला विरोध केला होता. ॲड. हरीश नायर म्हणाले, “अशा मोठ्या घोटाळ्यांमुळे देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी होते. घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी न्यायव्यवस्थेने अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.”
Prasad Yadavrao Sali यांना 70 लाख रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात मोठा धक्का बसला असून कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती Parveen Saiyyed यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे नमूद करत जामीनासाठी सबळ आधार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात आरोपी असलेल्या पत्नी Vaishali Prasad Sali यांचा अटकपूर्व जामीन अर्जही यापूर्वी फेटाळण्यात आला असून त्यांनी दिलासासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.