कल्याण : ‘लव्ह जिहाद’ आगरी कोळी समाजाच्या दारावर आलाय. दाराजवळ नाही तर घरात घुसलाय. एक-दोन मुली लव्ह जिहादच्या बळी पडून घर सोडून धर्म सोडून निघून गेले. विधानसभेत हा विषय मांडणार होतो. मात्र, नंबर आला नाही. नाहीतर अबू आझमीसह आणखी तीन-चार जण आहेत. त्यांना तर सरळ सांगणार होतो **,**जमातच नष्ट करून टाकू, असे विधान शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी ठाण्यात आगरी सेनेच्या मेळाव्यात केले.
आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तर याबाबत बोलताना विश्वनाथ भोईर यांनी ‘लव्ह जिहाद’ आगरी कोळी समाजापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे मी राग व्यक्त केला अशी प्रतिक्रिया दिली. औरंगाजेब आणि ‘लव्ह जिहाद’वरून सध्या राज्याचा राजकारण तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला. तर दुसरीकडे विधानभवनात देखील आमदार लव्ह जिहाद, औरंगजेबबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. आता लव्ह जिहाद प्रकरणाबाबत कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत ते ‘लव्ह जिहाद’बाबत बोलताना आक्रमक झाल्याचे दिसून येतेय.
प्रश्न उपस्थित करणार होतो. पण माझा नंबर आला नाही. लव्ह जिहाद आगरी कोळी समाजाच्या दारावर आलाय. दाराजवळ नाही तर घरात घुसलाय. एक-दोन मुली लव्ह जिहादच्या बळी पडून घर सोडून धर्म सोडून निघून गेले. अबू आझमीसह आणखी तीन चार जण आहेत. त्यांना तर सरळ सांगणार होतो **,**जमातच नष्ट करून टाकू, असे त्यांनी सांगितले.