Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे मोठे ‘राजकीय धक्कातंत्र’; आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?

Eknath Shinde: या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होऊ शकते

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 09:56 AM
Eknath Shinde, Shivsena, MLC Election 2026, Kshitij Thakur, Thane Politics, Maharashtra Politics,

Eknath Shinde, Shivsena, MLC Election 2026, Kshitij Thakur, Thane Politics, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  •  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठे राजकीय धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत
  • शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता
  • बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर हेदेखील शिंदेसेनेच्या वाटेवर
Eknath Shinde Politics :  राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठे राजकीय धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एका राजकीय पक्षाचे थेट शिंदेसेनेत विलीनीकरण करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा रंगली आहे.

या नव्या राजकीय घडामोडींमुळे शिंदेसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फाटक यांच्या जागी क्षितीज ठाकूर यांची अनपेक्षित एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Vidhan parishad Election 2026: नाशिक, संभाजीनगर, पुण्याचा तिढा कायम: विधान परिषद जागावाटपावर फडणवीसांचे सूचक विधान

याआधी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी त्यांची प्रहार संघटना शिंदे सेनेत विलीन करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर हेदेखील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती पुढे येत आहे.

विधान परिषद निवडणुकीत मतांची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेकडून ही राजकीय खेळी केली जात असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या ऐवजी क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बहुजन विकास आघाडी (BVA) शिंदे सेनेत विलीन होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार भागात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. पण आता बहुजन विकास आघाडीदेखील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे विधान परिषद निवडणुकीत मतांच्या गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे.

“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक

माजी आमदार रवींद्र फाटकांचा पत्ता कट?

बहुजन विकास आघाडीच्या या अनपेक्षित राजकीय समीकरणांमुळे शिंदे सेनेचे निष्ठावंत नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊ शकतो. रवींद्र फाटक हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी मोठे राजकीय धक्कातंत्र वापरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाटक यांच्या ऐवजी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकुर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत प्रहार संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकीय धक्कातंत्र वापरण्यात आले होते, त्याच धर्तीवर यावेळी थेट बहुजन विकास आघाडीचे शिंदे सेनेत विलीनीकरण करून क्षितिज ठाकूर यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य राजकीय हालचालीमुळे ठाणे आणि वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काही दिवसांत महायुतीच्या उमेदवारीबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Mlc election 2026 bahujan vikas aghadi merger with shiv sena shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
1

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
3

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
4

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.