Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीत भाजप आणि शरद पवार गटाने एकत्र येत भाजपच्या छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी निवड केली. एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीनंतर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे राज्यात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 10, 2026 | 03:10 PM
मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

Follow Us
Follow Us:
  • कर्जत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप-शरद पवार गटाची हातमिळवणी
  • राम शिंदे आणि रोहित पवार यांचे राजकीय समीकरण चर्चेत
  • जयंत पाटील-विनोद तावडे भेटीच्या चर्चांना मिळाले बळ
 

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आणि एक विधानपरिषद आमदार शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे चित्र होते. आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला असून एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप हे एकत्र आले आहे आहेत. यामुळे मोठ्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राज्यात शरद पवार यांची राष्टवादी आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. अश्यातच आता मोठी अपडेट येत असून मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याच्या बातम्या समोर येत आहे.

कर्जत तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार गट एकत्र

राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता मात्र तालुका लेव्हलवर ते एकत्र आले आहेत. अहिल्यानंगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शरद पवार गट एकत्र आले असून कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाली आहे.

Maharashtra Politics: राजकारणात खळबळ! 12 नगरसेवक शिंदे गटात जाणार? अफवांवर ठाकरे गटाचे थेट उत्तर; पत्रकार परिषदेत मोठा ट्विस्ट

नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्यावर अविश्वास ठराव करण्यात येणार होता. पण त्यापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला. रोहिणी घुले यांना बाजूला ठेवण्यासाठी भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आले. यामुळे कर्जत नगर पंचायतीवर राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहणार आहे. कर्जत – जामखेडच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. रोहित पवारांनी दोनदा रामशिंदेंचा पराभव केला आहे. परंतु आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार दोन्ही राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

शरद पवार महायुतीसोबत जाणार? एकनाथ शिंदे भेटीनंतर चर्चाना उधाण

बुधवारी विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळासाठी बैठक सोडून शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका विषय अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

Harshwardhan Sapkal News: मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा शोभत नाही; ‘मिसिंग लिंक’वरून सपकाळांचा पलटवार 

माहितीनुसार, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. बैठकीत आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Bjp sharad pawar group alliance karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
2

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Karjat News : पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे
4

Karjat News : पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.