Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम देत स्पष्ट आदेश; म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”

सध्या राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. निशिकांत दुबे, संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2025 | 09:47 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम देत स्पष्ट आदेश; म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मीरा भाईंदर रस्त्यावर मागील दोन ते तीन तासांपासून जोरदार राडा सुरु होता. मीरा भाईंदरमधील व्यावसायिकांनी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चिघळला  आहे. मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मनसे आक्रमक झाली होती. पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांबरोबर धक्काबुक्की देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.

https://twitter.com/RajThackeray/status/1942609666099548580

माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.

सध्या राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. निशिकांत दुबे, संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान आपल्या पक्षकडून चुकीची विधाने किंवा आपल्या पक्षांची चुकीची भूमिका जाऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आपल्या कार्यकर्त्याना हा स्पष्ट आदेश दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मिळाली परवानगी

मराठी भाषिकांबाबत आणि भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे मीरा भाईंदर रोड येथे मोर्चा काढणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. या रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. संघर्षमय ठिकाणाहून मनसे मोर्चा घेऊन जाण्यासाठी अडून राहिल्याने पोलिसांनी परवानगी दिली नाही अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यानंतर आक्रमक आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. तसेच आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेत ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना देखील ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.

Mira Bhayandar MNS Morcha : दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मिळाली परवानगी; मीरा भाईंदर रस्त्यावर मनसे-ठाकरे गटाचा मोर्चा

सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी दिली

मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की,  “प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली ” असा टोला त्यांनी लगावला आहे.

Web Title: Mns chief raj thackeray order to party people do not speak to media marathi language dsipute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Marathi language Compulsory
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
4

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.