Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उष्माघाताच्या घटनेवर राज ठाकरेंचं ट्विट; ‘…तर हा प्रसंगच उद्भवला नसता’

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान सोहळा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्री सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2023 | 02:38 PM
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उष्माघाताच्या घटनेवर राज ठाकरेंचं ट्विट; ‘…तर हा प्रसंगच उद्भवला नसता’
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान सोहळा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्री सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. पण याच मुद्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत यावर भाष्य केले.

काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते… — Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) झालेल्या या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने गर्दी होती. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. पण प्रचंड उष्णतेचा त्रास तेथील उपस्थितांना झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थ होऊ लागले. पण यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. त्यात आता राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले. याबाबत त्यांनी ट्विट केले असून, त्यामध्ये म्हटले की, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला. ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच त्यांनी पुढे म्हटले की, ‘कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

Web Title: Mns chief raj thackeray tweet on maharashtra bhushan program incident nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2023 | 02:36 PM

Topics:  

  • Amit Shah
  • appasaheb dharmadhikari
  • maharashtra bhushan
  • maharashtra bhushan award
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
1

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
2

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा
3

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; “सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही”
4

संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; “सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.