Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

INDIA Alliance EC March: निवडणूक आयोगाच्या परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी उपस्थित आहेत.   एनएसयूआयचे अनेक कार्यकर्ते आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 06, 2026 | 03:44 PM
Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Narendra Modi, Amit Shah, Mohan Bhagwat

Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Narendra Modi, Amit Shah, Mohan Bhagwat

Follow Us
Follow Us:
  • प्रियांका गांधींसह अनेक नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; राहुल गांधींचे रस्त्यावर धरणे आंदोलन.
  • भाजपला केवळ विरोध करणार नाही, तर नेस्तनाबूत करू,” राहुल गांधींचा घणाघाती हल्ला
  • मोदी, शाह आणि मोहन भागवत यांनी लोकशाही संपवल्याचा आणि देशद्रोह केल्याचा राहुल गांधींचा आरोप
 

Rahul Gandhi Aggressive Speech Delhi Protest Election Commission : केंद्रीय निवडणूक आयु्क्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक आयोगावर आज मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस सह इंडिया आघाडी आणि इतर घटक पक्षांचे जवळपास ३०० हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्येय मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया अलायन्सच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आम्ही केवळ भाजपशी संघर्ष करणार नाही, तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करू. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकशाही संपवली आहे. ” आपल्या देशासोबत जे केले गेले आहे त्याला देशद्रोह म्हणतात आणि त्यातून कोणीही सुटू शकणार नाही.” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

यामुळे भारतीय निवडणूक आयोगाजवळील परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी उपस्थित आहेत.   एनएसयूआयचे अनेक कार्यकर्ते आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया अलायन्सच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, आजच्या आंदोलनात सुमारे ३०० विरोधी खासदार सहभागी झाले होते. “आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडण्यापासून रोखले जात आहे.”

आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आकाशवाणी भवनात दाखल

मंगळवारी निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान एक अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी अचानक आकाशवाणी भवनच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले.

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

राहुल गांधी ऑल इंडिया रेडिओच्या आवारात आंदोलन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज सकाळी, ऑल इंडिया अलायन्सच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खासदारांना बळजबरीने थांबवले. सध्या, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वद्रा यांच्यासह इतर अनेक नेते, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ऑल इंडिया रेडिओच्या आवारात आंदोलनावर बसले आहेत.”

 

Web Title: Will wipe out the bjp rahul gandhis open challenge as 1349681

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Election Commission
  • INDIA Alliance
  • mohan bhagwat
  • narendra modi
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा
1

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

INDIA Alliance Protest Gyanesh Kumar: CEC ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्ली तापणार; इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगाला घेराव
2

INDIA Alliance Protest Gyanesh Kumar: CEC ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्ली तापणार; इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगाला घेराव

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
3

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
4

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.