कल्याण : कल्याण पश्चिमेतील (Kalyan West) दुर्गाडी चौकात (Durgadi Chowk) छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (Equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj) असून या स्मारकाची दुरवस्था झाली आहे (The monument is in Bad Condition). याबाबत मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर (MNS branch president Mahesh Bankar) यांनी केडीएमसी आयुक्त (KDMC Commissioner) आणि शहर अभियंत्यांना पत्र देत (Letter To City Engineer) स्मारकची दुरुस्ती (Repair) करण्याची मागणी (Demand) केली आहे.
[read_also content=”Mumbai Metro स्थानकांची विचित्र पद्धतीने लिहिलेली नावं पाहून प्रवाशांच्या डोक्याचं झालं भज्जं, Twitter वर चर्चेला उधाण आलंया https://www.navarashtra.com/viral/mumbai-metro-stations-named-after-brands-goes-viral-on-social-media-people-reacts-on-twitter-this-way-nrvb-397918.html”]
कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दुर्गाडी चौक येथील स्मारकाला गेल्या आठवड्यात गाडीने धडक दिल्याने तेथील तटबंदी तुटून संरक्षण जाळी खाली पडली आहे. तसेच काही लाईट बंद पडल्या आहेत. बरेच नुकसान झाले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या गाडीवर गुन्हा दाखल करावा. पुढील महिन्यात पावसाळा सुरु होत आहे म्हणून लवकरात लवकर या चौकातील स्मारकाचे महापालिकेच्या मार्फत दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी महेश बनकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 11 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-11-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]