Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच होतोय ठाण्यात; राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष…

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) उद्या होत आहे. हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) साजरा केला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2023 | 09:56 PM
मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच होतोय ठाण्यात; राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष…
Follow Us
Follow Us:

ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) उद्या होत आहे. हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) साजरा केला जाणार आहे. त्यामुळे उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन दरवर्षी मुंबईत साजरा केला जातो. पण यावर्षी पहिल्यांदाच वर्धापन दिन ठाण्यात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात आहे. त्यामध्ये सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. तसेच ‘संघर्षाची तयारी…पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.

राज्यात सत्तांतरानंतरचा पहिला वर्धापनदिन

राज्यात शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकार स्थापनेनंतरचा राज ठाकरेंच्या मनसेचा पहिलाच वर्धापनदिन आहे. त्यामुळे आता या वर्धापनदिनी राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रम

मनसेचा वर्धापन दिन दरवर्षी मुंबई साजरा केला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच ठाण्यात साजरा करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे उद्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Mns foundation day is tomorrow for the first time in thane celebrated raj thackeray will speak nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2023 | 09:56 PM

Topics:  

  • Mumbai
  • raj thackeray
  • thane
  • Thane Rally

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.