• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mns Leader Amit Thackeray Warn On Sion Koliwada Physical Abuse Case

Amit Thackeray : ‘हे फक्त शब्द नाहीत, तर आता वेळ आली आहे’; अमित ठाकरेंनी कोणाला दिला इशारा

मुंबईतील सायन कोळीवाडा भागात सोमवारी रात्री एका चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 26, 2024 | 07:43 PM
'हे' फक्त शब्द नाहीत, तर आता वेळ आली आहे'; अमित ठाकरेंनी कोणाला दिला इशारा

'हे' फक्त शब्द नाहीत, तर आता वेळ आली आहे'; अमित ठाकरेंनी कोणाला दिला इशारा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईतील सायन कोळीवाडा भागात सोमवारी रात्री एका चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून फेसबुक पोस्टद्वारे इशाराचं दिला आहे.

काय म्हटलं आहे अमित ठाकरेंनी

सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.

मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.

मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.

सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे.

जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची, वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Mns leader amit thackeray warn on sion koliwada physical abuse case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 07:43 PM

Topics:  

  • amit thackeray
  • maharashtra election 2024
  • MNS Leader Raj Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray in Shivtirtha : नव्या युतीचा श्री गणेशा? उद्धव ठाकरेंनी घेतले राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन
1

Uddhav Thackeray in Shivtirtha : नव्या युतीचा श्री गणेशा? उद्धव ठाकरेंनी घेतले राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक
2

राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण…; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

Raksha Bandhan:शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बहिणींची वर्णी, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा पाहून तुम्हीही भारावाल
3

Raksha Bandhan:शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बहिणींची वर्णी, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा पाहून तुम्हीही भारावाल

‘मराठी’ने घडवली राज्याच्या भविष्याची गळाभेट; अमित अन् आदित्यची जोडी करणार कमाल? वाचा सविस्तर…
4

‘मराठी’ने घडवली राज्याच्या भविष्याची गळाभेट; अमित अन् आदित्यची जोडी करणार कमाल? वाचा सविस्तर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.