Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS- Thackeray Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीला बडव्यांचा विरोध? ठाकरे गट एक पाऊल पुढे, पण मनसेतून विरोधाचा सूर

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुती आणि महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 21, 2025 | 09:23 AM
MNS- Thackeray Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीला बडव्यांचा विरोध? ठाकरे गट एक पाऊल पुढे, पण मनसेतून विरोधाचा सूर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ चर्चेपुरती मर्यादित असलेली ही शक्यता यावेळी मात्र प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) पुन्हा हातमिळवणी केल्यास राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुती आणि महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी काही ठोस पावलंही उचलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी तरी हे दोघे बंधु एकत्र येणार का, मनसे-ठाकरे गटाची युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण या युतीसाठी मात्र मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडूनच विरोधाचा सुरू उमटताना दिसत आहे.

शेअर बाजारातील तेजी कायम राहील की ट्रम्प टॅरीफचे टेन्शन?

गेल्या काही वर्षांत एकमेकांविरोधात टोकाच्या टीका आणि मतभेद असताना या युतीच्या चर्चांवरूनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरु असल्याने वातावरण तापले आहे. विशेषतः, कधी काळी राज ठाकरे यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’ असं म्हणत शिवसेना सोडली होती. आज तेच ‘बडवे’ – म्हणजे पक्षातील वरिष्ठ सल्लागार आणि मध्यस्थ – या संभाव्य एकत्र येण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरत असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय पटलावर मोठी हलचाल होऊ शकते, पण त्यांच्या सभोवतालच्या मंडळींनी हे समीकरण कसे हाताळले जाते, यावर या युतीचे भवितव्य अवलंबून असेल.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याची भूमिका मांडल्यानंतर काही क्षणातच उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. पण त्याचवेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी  उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडून त्यांना धोका दिला,  आता ते पवारांनाही धोका देतील, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच, उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना  मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले होते, त्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांवर 17 हजार गुन्हे दाखल केले होते. याची आठवण करून देत त्यांनी जुना वाद पुन्हा उकरून काढला.

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, “महाराष्ट्रद्रोही कोण हे जर राज ठाकरे यांना समजत नसेल, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गच सुरू करावा लागेल,” असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपांंमुळे  ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही पक्षातील ‘दुसरी फळी’च युतीच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Web Title: Mns thackeray alliance the thackeray brothers alliance is being opposed by leaders within the party itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • BMC Elections
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 
1

“… असं सरकारला वाटत नाही?” लहान मुलांच्या बेपत्ता प्रकरणावर राज ठाकरे संतापले ; CM फडणवीसांना लिहिले पत्र 

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान
2

Maharashtra Politics : ‘उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नसले तरी ते…’; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान

Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
3

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
4

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.